राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना मनसेचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना मनसेचा इशारा.

 माफी मागा, अन्यथा शहरात एकही कार्यक्रम होवून देणार नाही.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना मनसेचा इशारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रद्रोही असल्याचे आक्षेपार्ह ट्विट करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची मने दुखावली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेची तसेच राज ठाकरे यांची जाहिर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणार्‍या काळात आमदार अमोल मिटकरी यांचा एकही कार्यक्रम अहमदनगर शहरात होऊ देणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भूतारे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर उदयास आले असे सत्यपरिस्थितीला अनुसरून विधान केले होते. हे विधान करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही. सत्य परिस्थिती त्यांनी मांडली त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षामध्ये भूकंप आला व  त्यांचे अनेक नेते राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका करायला लागले परंतू राजकारणात एखाद्या टिकेला उत्तर देताना ते वैचारीक पध्दतीने दिले पाहिजे असेही भुतारे म्हणाले.

No comments:

Post a Comment