जिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

जिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश.

 जिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवप्रसाद भाऊसाहेब वाघचौरे (वय 38), विशाल पोपट निळे, अजय रावसाहेब निळे (वय 20) हे तिन्ही राहणार कौठे धांदरफळा नितीन अण्णा धीवर (वय 32) सचिन सिताराम गायकवाड (वय 32) हे दोन्ही राहणार शिर्डी, आकाश दिनकर सौदागर (वय 20) शिर्डी या सहा जणांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यातून आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन हद्दपारीचे आदेश दिले आहेत.
संगमनेर, शिर्डीसह श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून आलेल्या काही जणांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातून सहा जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या सहा जणांवर वाळू चोरी, विनयभंग, दुखापत करणे, शिवीगाळ करणे आदी गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षकांनी या तीन आरोपींना नगर जिल्ह्यातून 15 महिन्यांकरिता हद्दपार केले आहे.
संगमनेर पोलीस ठाण्याकडून जिल्हा अधीक्षकांकडे आलेल्या प्रस्तावात आरोपी शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे, अजय रावसाहेब निळे व विशाल पोपट निळे यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय शिर्डी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार आरोपी नितीन अण्णा धीवर, सचिन गायकवाड यांना 18 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. श्रीरामपूर पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावात आकाश सौदागर याच्यावर बळजबरीने चोरी करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. त्यानुसार सौदागर यास 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

No comments:

Post a Comment