स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर येथील प्रेम पांडुरंग चव्हाण हा राहुरीत गावठी कट्टा विक्रीसाठी आला असता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास गजाआड करून 1 गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहुरी कारखाना परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी कारखाना परिसरात असलेल्या हॉटेल साक्षी येथे सापळा रचला. दरम्यान आरोपी प्रेम चव्हाण हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने सदर हॉटेल समोर आला. आणि परिसराची टेहाळणी करू करू लागला. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी खात्री पटताच मोठ्या शिताफीने प्रेम वर झडप घेतली. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिंवत काडतुस असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ दिवटे,गणेश इंगळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी,रवी सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल घुंगासे, सागर ससाणे,रोहित येमुल,चालक हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांनी केली आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment