भारतमातेचा जयजयकार करत भाजप कार्यालयात भारतमाता पूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

भारतमातेचा जयजयकार करत भाजप कार्यालयात भारतमाता पूजन

 भारतमातेचा जयजयकार करत भाजप कार्यालयात भारतमाता पूजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारताच्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पक्षाच्या गांधी मैदान येथील कार्यालयात विधिवत झेंडावंदन व भारतमाता प्रतिमा पूजन शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जेष्ठनेते सुनील रामदासी, सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी गटनेता सुवेंद्र गांधी, महिला आघाडी प्रमुख अंजली वल्लाकटी, नगरसेविका सोनाबाई शिंदे, सोनाली चितळे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, सतीश शिंदे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतमातेचा जयजयकाराच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
महेंद्र गंधे म्हणाले, मातृभूमीच्या सेवकांनी भाजप पक्षाची स्थापना केली आहे. भाजपाचे प्रत्तेक कार्य देशाला समर्पित असते. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार आज आपल्या देशास पुढे नेत आहे. 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना देशात आज मोठमोठी विकासाचे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा अभिमान आम्हा सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.
यावेळी कालिंदी केसकर, चेतन जग्गी, सचिन पारखी, जगन्नाथ निंबाळकर, विलास गांधी, संतोष गांधी, महेश नामदे, ज्ञानेश्वर काळे, लक्ष्मिकांत तिवारी, जालिंदर तनपुरे, गणेश साठे, तुषार पोटे, डॉ.विलास मढीकर आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here