51 गुन्हे करणारे चौघे सराईत अखेर जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

51 गुन्हे करणारे चौघे सराईत अखेर जेरबंद

 51 गुन्हे करणारे चौघे सराईत अखेर जेरबंद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चोर्‍या, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न व खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या व पेट्रोल पंपावर दरोडे घालणारी चार सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली आहे. या गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. या घटनेत 4 आरोपींना अटक केली आहे. त्याच्या कब्जातुन 1 लाख 80 हजार- रु. किं.च्या तीन मोटार सायकल हस्तगत केले आहे.
आरोपी मध्ये  कृष्णा विलास भोसले, (वय 22 वर्षे, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, बीड), सुरेश पुंजाराम काळे, (वय- 38 वर्षे, रा. सोनवीर, ता. शेवगाव, जि. अ.नगर),  रावसाहेब विलास भोसले, (वय- 40 वर्षे, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड), अजिनाथ विलास भोसले, (वय- 25 वर्षे, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे.याबाबतची माहिती अशी की, दिनांक 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 च्या सुमारास फिर्यादी अक्षय कुंडलीक गोल्हार, (वय - 30 वर्षे, रा. कोहीनूर मंगल कार्यालयासमोर, सावेडी, नगर) यांचे मालकीचे नगर-सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात 7 ते 8 आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करुन व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 2,55,800/-रु. रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. या घटनेबाबत नगर तालूका  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
तसेच दि. 11 रोजीचे पहाटे . 3 चे सुमारास फिर्यादी जयवंत शिवाजी फाळके, (वय 38 वर्षे, रा. कर्जत, ता. कर्जत, जि. नगर) यांचे मालकीचे नगर-सोलापूर रोडवरील थेरगाव फाटा येथील फाळके पाटील अ‍ॅण्ड सन्स या भारत पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपावरील कर्मचान्यांना मारहाण करुन 99,500/- रु. रोख रक्कम व 24,000 /- रु. कि. चे चार मोबाईल असा एकूण 1,23,500/-रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता.
हा गुन्हा करणारे आरोपी हे त्यांचे गावी हातवळण, ता. आष्टी येथे आलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ हातवळण येथे जावून सापळा लावून व पाठलाग करुन आरोपी कृष्णा भोसलेला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. . पेट्रोल पंप दरोडे त्यांने व इतर तिन साथीदारानी मिळून केले असल्याची माहिती दिल्याने या आरोपीतांचा शोध घेतला. व ताब्यात घेतलेल्या वरील नमुद चार आरोपी कडून सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या 1,80,000/-रु. किं. च्या बिना नंबरच्या तीन होंडा शाईन मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या असून आरोपींना मुद्देमालासह नगर तालूका पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही नगर तालूका पो.स्टे. करीत आहेत. या कारवाई दरम्याण आरोपी सुरेश पुंजाराम काळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे विरुध्द यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता सदर आरोपी शेवगाव पो.स्टे. गुरनं. 55/2020, भादविक 302, 452, 37 या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, सुनिल चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, दत्तात्रय हिगडे, मनोहर गोसावी, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, रविन्द्र घुंगासे, प्रकाश वाघ, रोहीत येमूल, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, विजय धनेघर, चालक उमाकांत गावडे, बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पकडलेल्या या चारही आरोपींवर 2008 सालापासून विविध गुन्हे दाखल होते अनेक गुन्ह्यांमध्ये ते फरार पण होते आरोपी कृष्णा भोसले याच्याविरुद्ध नऊ गुन्हे, दुसरा आरोपी आजिनाथ भोसले याच्याविरुद्ध पंधरा गुन्हे दाखल आहेत तर रावसाहेब भोसले या आरोपींवरुद्ध सर्वाधिक 21 गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी सुरेश काळे याच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here