पूर परिस्थिती उद्भवल्यास, मनपाची आपत्कालीन पथके सज्ज. - आयुक्त शंकर गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

पूर परिस्थिती उद्भवल्यास, मनपाची आपत्कालीन पथके सज्ज. - आयुक्त शंकर गोरे

 पूर परिस्थिती उद्भवल्यास, मनपाची आपत्कालीन पथके सज्ज. - आयुक्त शंकर गोरे

मनपा आयुक्तांनी केली सीनानदी पूर परिस्थितीची पाहणी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये पूर परिस्थिती जास्त प्रमाणात उद्भवल्यास अहमदनगर महानगरपालिकेची आपत्कालीन विभागाची पथके सज्ज आहे.तरी नागरिकांनी पूर परिस्थिती उद्भवल्यास काही अडचणी असल्यास त्वरित अहमदनगर महापालिकेत संपर्क साधावा असे आवाहन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे. शहरातील विविध ठिकाणी आयुक्त शंकर गोरे यांनी पाहणी केली यावेळी समवेत शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि.श्रीकांत निंबाळकर तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. या सर्व परिस्थितीचा आढावा मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून जाणून घेतला. यावेळी ते बोलत होते. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पावसाने कालपासून जोर धरला आहे. आज सकाळी देखील पावसाची रिमझिम सुरू आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे.नेप्तीनाका येथील नगर-कल्याण रोडवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. तसेच अहमदनगर शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. काही वसाहतींमध्ये सखल भागांत पाणी साचले आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र सुरू असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करणे अवघड झाले आहे. नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक करणे कठीण झाले आहे. मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.
नगर शहरातील सीना नदी वरील अतिक्रमणे भुयारी गटारांची अपुरी कामे रस्ता कामांसाठी खोदलेले खड्डे याबाबत आयुक्तांनी दखल घेण्याची गरज आहे
कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलावर एक ट्रॅव्हलर बस पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. बसमधील चालकाला स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढल्यास बस वाहून जाण्याची भीती आहे.

No comments:

Post a Comment