मित्रानेच काढला मित्राचा काटा.. पोलिसांचा जलद गतीने तपास. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

मित्रानेच काढला मित्राचा काटा.. पोलिसांचा जलद गतीने तपास.

 मित्रानेच काढला मित्राचा काटा.. पोलिसांचा जलद गतीने तपास.

खून करणारा आरोपी गजाआड.
केडगाव औरंगाबाद बायपास ब्रिजजवळील मृतदेहाची ओळख पटली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दि. 25 ऑगस्ट रोजी  केडगाव अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ 25 ऑगस्टला एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आले होते. सदर मयताचे शवविच्छेदन केले असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने टणक हत्याराने पाठीत मारलेमुळे व फुप्फुसास सुज आल्याने तो मरण पावला. असल्याचे दिसून आले होते. सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेचा शोध लावण्याचे आदेश दिले होते, ग्रामीण विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त केल्यानंतर खून करणार्‍या आरोपीचा नगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास लावून त्यास न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने आरोपीस 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विकास महादेव कदम वय 40 वर्ष रा.वैष्णवी नगर केडगाव हे मयत इसमाचे नाव असून त्याचा निर्घुण खून करणारा आरोपी मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे रा.कायनेटिक चौक हे दोघे एकमेकांचे मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमध्ये आरोपी मिनींनाथ  व विकास यांचे मैत्रीचे संबंध होते हे दोघेजण एका खाजगी ठिकाणी चालक म्हणून कामाला होते, या दोघांमध्ये अंतर्गत वाद झाल्यामुळे  विकास याला लाकडी दांड्याने मारहाण केली होती, या मारहाणीमध्ये विकासाचा मृत्यू झालेला होता. मारहाणं इतकी जबर करण्यात आली होती की विकास याचा चेहरा दिसून येत नव्हता सदर मयताची ओळख पटविणेकामी सर्व जिल्ह्यामधे तसेच नजीकच्या जिल्ह्यामधे संदेश देण्यात आलेला  होता. तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सदर मयत व्यक्तीची ओळख पटवली गेली.
घडलेल्या घटनेनंतर नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.न. 475/2021 भादवि क.302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी संबंधित मयत झालेला इसम याची एक दिवसांमध्ये ओळख पटवून त्याचा नातेवाईकांच्या माध्यमातून विविध माहिती पोलिसांनी हस्तगत केली होती.
ही कारवाई पोलीस अधिक्षक  मनोज पाटील . अपर पोलीस अधिक्षक . सौरभ कुमार अग्रवाल. उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सफो पठाण, पोहेकॉ रमेश गांगर्डे, रावसाहेब खेडकर, पोना सोनवणे, धर्मराज दहिफळे, रवि सोनटक्के पोकॉ ज्ञानेश्वर खिळे, प्रशांत राठोड, जयदत्त बांगर चालक सफी घोरपडे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment