ना. आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत रविवारी ४ कोटी ६५ लक्ष रुपयांचा कामांचा शुभारंभ..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 28, 2021

ना. आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत रविवारी ४ कोटी ६५ लक्ष रुपयांचा कामांचा शुभारंभ..!

 ना. आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत रविवारी ४ कोटी ६५ लक्ष रुपयांचा कामांचा शुभारंभ..!

खडकवाडीत विविध विकास कामांचा शुभारंभ..


नगरी दवंडी
पारनेर - महाराष्ट्र राज्याचे विधी व न्याय मंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते रविवारी ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌दुपारी  ४ कोटी ६५ लक्ष रुपयांचा खडकवाडीत विविध विकास कामांचा शुभारंभ आयोजित केला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व तीन तालुक्याला जोडणारा राहता- लोहारे -मांडवा श्रीगोंदा रामा ६७ किमी या रस्त्यांच्या  सुधारणांसाठी - ३.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे तीन तालुक्याच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दाह तीव्र प्रमाणात असतानाही आमदार लोकनेते निलेशजी लंके यांनी मतदार संघात कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्द केला आहे .त्या पैकी ४ कोटी ६५ लक्ष ईतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधीचा भुमीपुजन समारंभ संपन्न होत आहे.तालुक्यातील सदर विवीध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी राज्याचे मंत्री ना.आदितीताई तटकरे (राज्य मंत्री विधी व न्याय, उद्योग , पर्यटन , फलोत्पोदन , क्रिडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते तसेच आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या अध्यक्षते खाली तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ( तात्या ) फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२९ ऑगस्ट २०२१ रोजी सायं ४-०० वा. हनुमान मंदीर खडकवाडी येथे आयोजीत केलेले आहे.राहता- लोहारे -मांडवा श्रीगोंदा रामा ६७ किमी ५५/०० ते ६१/०० मध्ये सुधारणा - ३.५० कोटी मांडवा- देसवडे-पोखरी-पिंपळगाव रोठा-अक्कलवाडी रस्ता प्रजिमा २९ किमी ११/५०० मध्ये सुधारणा करणे - १ कोटी खडकवाडी येथे हनुमान मंदिरासमोर रस्ता काँक्रिटीकरण करणे.- १५लक्ष अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.तरी शासनाच्या कोव्हिड अटी व नियमांचे पालन करत सदर उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे हि विनंती पारनेर-नगर विधान सभा मतदार संघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने आवाहन  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment