मंदिरं उघडण्यासाठी भाजपा आक्रमक; राज्यभर आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 30, 2021

मंदिरं उघडण्यासाठी भाजपा आक्रमक; राज्यभर आंदोलन

मंदिरं उघडण्यासाठी भाजपा आक्रमक; राज्यभर आंदोलन 

शंखनाद, घंटानाद!

पोलीस व भाजपा कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की.मुंबई - कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र, मंदिरं बंदच ठेवली. त्यामुळेच भाजपने आज सोमवारी राज्यभर शंखनाद आणि घंटानाद आंदोलन पुकारले आहे. पुणे, नाशिक, नागपूर, शिर्डी, औरंगाबादसह राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. मंदिरं पुढील आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झााल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद, पंढरपुर आणि पुण्यातील मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे धुमश्चक्री पाहायला मिळाली. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा गणपतीच्या मंदिराच्याबाहेर शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शंखनाद आंदोलन केलं. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचेही बोललं जात आहे.

शिर्डी : भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीमाता मंदिरासमोर आंदोलन केले असुन मंदिर उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी मंदिर लवकरात लवकर उघडावीत अशी मागणी केलीय.
पंढरपूर - पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यामुळे पुढचा अनर्थ टळला.
नाशिक - ’मंदिर हम खुलवायेंगे, धर्मको न्याय दिलायेंगे’ अशी हाक देत भाजप (इगझ) आध्यात्मिक आघाडीने आजच्या गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिली. मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्येही आध्यात्मिक आघाडीतर्फे रामकुंडावर आंदोलन करण्यात आले.
नागपूर - आज जन्माष्टमी आहे. हिंदूंचा सण आहे. त्यामुळे आज काहीतरी भूमिका घ्या आणि मंदिरे उघडा, असे भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज नागपुरातील कोराडी परिसरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील गजानन महाराज मंदिरासमोर भाजपच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी संभळ, शंखनाद वाजवण्यात आला. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तरी काही महिलांनी मंदिरात जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी आमदार अतुल सावे, संजय केनेकर, प्रवीण घुगे, प्रमोद राठोड, भाजप आध्यत्मिक आघाडीचे प्रमुख संजय जोशी यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई - मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाजपने आंदोलन केलं. यावेळी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. शिर्डी, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा आणि अमरावतीतही भाजपच्या वतीने घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केलं जात आहे.
बीड - मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंख नाद आंदोलन करत बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला आहे. आजपासून सरकारचे नियम पाळणार नाही आज पासूनभक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील असा निर्णय घेण्यात आला.

दोन वर्ष वारी नाही म्हणजे काय? वारकर्‍यांना विचारा. आज संपूर्ण महाराष्ट्रात शंखनाद आंदोलन सुरु आहे. यांना दारुच्या दुकानांचा आवाज ऐकू येतो मंदिर उघडली नाही, तर लोक आपल्या भावना दाबून ठेऊ शकणार नाही. मंदिराची कुलूप तोडली जातील. मंदिरात जायचं तर मातोश्रीत जायच का? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही संध्याकाळी ऑर्डर काढा. आजपूसन प्रवेश सुरु करा. दर्शनानंतरच आंदोलनाची सांगता होईल, उद्धवजी होश में आओ, होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका. - चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here