दिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 28, 2021

दिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी.

 दिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी.

वाढदिवसाच्या निमित्ताने काळकुपच्या युवकाला दिली अनोखी भेट!


नगरी दवंडी
पारनेर - तालुक्यातील काळकुप येथील गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थी कु.अतुल अशोक कदम याला वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी इलेक्ट्रॉनिक स्कुटी देवुन त्याचा आनंद द्विगुणित केला आहे.नगर येथे‌ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत असुन पायाने दिव्यांग असुन आपल्या पगारातुन ७५ हजार रुपयांची ही तीन चाकी इलेक्ट्रॉनिक स्कुटी भेट दिली आहे.विधानसभा निवडणुक झाल्यापासून अपंग बांधवांना आपल्या आमदारकीच्या पगारातून प्रत्येक महिन्याला तीन चाकी मोटर सायकल देण्याचा उपक्रम अविरत चालू ठेवला आहे. आमदार निलेशजी लंके यांनी काळकुप येथील एका दिव्यांग बांधवाला वाढदिवसाच्या दिनी अनोखी भेट दिली त्याचा आनंद द्विगुणित केला आहे.तर या गाडीमुळे शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून  कु.अतुल अशोक कदम या काळकुप येथील दिव्यांग बांधवाला आमदार लंके यांनी दिला मायेचा आधार दिला आहे.यावेळी लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन मेजर डॉ बाळासाहेब कावरे बाळासाहेब खिलारी बापूशेठ शिर्के ॲड.राहुल झावरे अजित भाईक श्रीकांत चौरे संदीप चौधरी पो.द.साळूंके गुरुजी,अमोल उगले नवनाथ गांजे रवींद्र गायके अंकुश पायमोडे संभाजी वाळुंज सत्यम निमसे चंद्रकांत ठूबे शरद झावरे ललित गागरे सुभाष कावरे शंकर कासुटे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळकुप ते नगर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येथे प्रवास करण्यासाठी दिव्यांग असल्या कारणाने विविध अडथळे निर्माण होत असताना आपल्या नेहमीच्या परोपकारी सवयीमुळे कु .अतुल कदम या बांधवाला त्याची भविष्याकडे पाहण्याची उमेद कमी होऊ नये म्हणून त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याला अपंगाची तीन चाकी मोटर सायकल भेट म्हणून दिली असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.यावेळी आमदार निलेशजी लंके यांनी दिव्यांग बांधव कु.अतुल कदम याला भविष्याची उंच भरारी घे,चांगला अभ्यास कर व एक यशस्वी नागरिक हो अशा शुभेच्छा दिल्या व भविष्यातही काहीही अडचण आली तरी मला संपर्क कर असा सल्ला यावेळी आमदार लोकनेते निलेश लंके यांनी दिला.

पारनेर तालुक्यातील काळकुप येथील गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थी कु.अतुल अशोक कदम याला नगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षणासाठी जात असताना शहरात फार मोठी अडचण होत होती.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना कार्यकत्यांसह नातेवाईकांनी मदतीचा हात मागताच तातडीने शुक्रवारी त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७५ हजार रुपयांची इलेक्ट्रॉनिक स्कुटी भेट देऊन त्यांचा कुटुंबातील सदस्यांना सत्कार पण केला.त्यामुळे पायाने दिव्यांग असलेल्या अतुल कदम याच्या पायात या एक प्रकारे बळ देण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले असल्याची प्रतिक्रिया पालक अशोक कदम यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here