नगर शहराची ओळख भविष्यकाळात हरित नगर म्हणून होईल- महापौर शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 9, 2021

नगर शहराची ओळख भविष्यकाळात हरित नगर म्हणून होईल- महापौर शेंडगे

 नगर शहराची ओळख भविष्यकाळात हरित नगर म्हणून होईल- महापौर शेंडगे

श्रावणी सोमवारचे औचित्य साधून गणेशनगर मध्ये वृक्षारोपनातून पर्यावरणाचा संदेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड वरील गणेश नगर येथे श्रावणी सोमवारचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आली आहे, गणेश नगर मधील नागरिक एकजुटीने सामाजिक प्रश्न सोडविता असतात याचबरोबर विकासाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत असल्यामुळे या भागांमध्ये विविध विकास कामे मार्गी लागली आहेत, गणेश नगरचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून लवकरच या भागाला नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. नव्याने विकसित होणारा गणेश नगरचा विस्तार झपाट्याने होत आहे. भविष्य काळामध्ये गणेश नगर हे शहरात विकासाचे मॉडेल ठरेल, या भागातील नागरिकांच्या एकजुटीमुळे वृक्षारोपण ही लोकचळवळ होईल याच माध्यमातून गणेश नगर भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाईल. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून नगर शहर हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा नगर शहराची ओळख भविष्यकाळात हरित नगर म्हणून होईल असे प्रतिपादन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी व्यक्त केले.
कल्याण रोड वरील गणेश नगर येथे श्रावणी सोमवार निमित्त वृक्षारोपन करताना महापौर रोहिणीताई शेंडगे, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे, राजेंद्र ताकपीरे, किसन जंगम, सुबोध कुलकर्णी, पोपट शेळके, गणेश मंचीकटला, संभाजी गरड, राहुल पिसार, राजेंद्र वाळके,महेश रसाळ,दिनकर आघाव, दयानंद मोरे, राजू तेल्ला, प्रकाश गागरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक शाम नळकांडे म्हणले की, प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्व नागरिकांना बरोबर घेऊन वृक्षारोपणाचे व संवर्धनाचे अभियान राबविनार आहे, वृक्षारोपणाचे महत्व समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वृक्षा पासून मानवी जीवनाला मोफत ऑक्सिजन मिळात असतो कोरोनाच्या काळात मानवाला विकत कृत्रिम ऑक्सिजन घ्यावा लागला आहे, ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना आता पटले आहे भविष्य काळामध्ये अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कल्याण रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहकार्यातून वनराई निर्माण करू, विकास कामांबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविविणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here