श्रीगोंद्याचे तहसीलदार पवार यांची बदली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 7, 2021

श्रीगोंद्याचे तहसीलदार पवार यांची बदली

 श्रीगोंद्याचे तहसीलदार पवार यांची बदली

नंदुरबार पुनर्वसन अधिकारी पदावर वर्णी..

श्रीगोंदा ः गेल्या वर्षी तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मान दिला. परंतु सतत वादग्रस्त ठरून मानहानीकारक बदली होणारे तहसीलदार पवार हे पहिलेच तहसीलदार ठरले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या अनुदान वाटपात झालेली हलगर्जी व दफ्तर दिरंगाईचा ठपका ठेवत साडेआठ महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार प्रदिपकुमार पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी या रिक्त पदावर पाठविण्यात आले आहे. गेल्यावर्षी तहसीलदार महेंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर श्रीगोंदयाच्या तहसीलदारपदी शेजारच्या शिरूर तालुक्यातील रहिवासी असणारे प्रदिपकुमार पवार यांची अधिकार्‍यांच्या दृष्टीने आवडत्या श्रीगोंदयाच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाली. परंतु त्यांचे कार्य काळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफांसमोर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पात्र शेतकर्‍यांना वेळेत मदत देण्याची गरज असताना दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणामूळे सुमारे 2 कोटी 12 लाख रुपये शासनाला परत पाठवण्याची नामुष्की ओढवली होती. बाधित खातेदारांना होणारी मदत विविध कारणांमुळे वंचित ठेवण्यात आली होती. तर नदीकाठच्या चार गावांतील 36 शेतकर्‍यांना पात्र मर्यादेपेक्षा अतिरिक्त क्षेत्रासाठी मदतीचे वाटप केले होते. पवार यांनी शासकीय कर्तव्ये जबाबदारीने व तत्परतेने पार न पडल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांचे बदल्यांची विधिनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडत असताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अन्वये 4(5) नुसार त्यांची बदली करण्यात आली आहे.
तालुक्यातील सत्ताधारी व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सल्ल्यानुसार काम करण्याचे दडपण झुगारून दिल्यामुळे अनेक नेते असंतुष्ट होते. या नेत्यांनी पवार यांच्या विविध तक्रारी मुंबईपर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते. याशिवाय कोविडच्या दुसर्‍या लाटेत झालेले विविध आरोप, तालुक्यातील अवैध वाळूउपसा, बेसुमार गौणखनिज चोरी याला संपूर्ण आळा घालण्यात आलेले अपयश, तालुक्यातील बेरकी राजकारणाचा जबाबदारी स्विकारल्यानंतर अनुभव बदलीस कारणीभूत आहे. 


No comments:

Post a Comment