न्युक्लियस हॉस्पिटल, कोविड सेंटर, कृष्णा व ग्लोबल पॅथॉलॉजी यांना औरंगाबाद खंडपीठाच्या नोटीस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 7, 2021

न्युक्लियस हॉस्पिटल, कोविड सेंटर, कृष्णा व ग्लोबल पॅथॉलॉजी यांना औरंगाबाद खंडपीठाच्या नोटीस.

 न्युक्लियस हॉस्पिटल, कोविड सेंटर, कृष्णा व ग्लोबल पॅथॉलॉजी यांना औरंगाबाद खंडपीठाच्या नोटीस.

कोरोना नसताना रुग्णावर कोरोनाचा उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घशात व पोटात दुखत असल्याने शहरातील बबनराव खोकराळे यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर कोविड सेंटर व बालिकाश्रम रोड वरील न्यूक्लियस हॉस्पिटल मध्ये कोरोना नसताना कोरोनावर उपचार केल्याबद्दल विळद घाटातील विखे पाटील हॉस्पिटल मधील कृष्णा लॅब, बालिकाश्रम रोड वरील ग्लोबस पॅथॉलॉजी अँड इम्युनो लॅबकडुन कोरोनाचे बोगस आर टी पी सी आर रिपोर्ट बनवल्याबद्दल त्यांचेवर कारवाई व्हावी यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अशोक खोकराळे, स्वर्गवासी बबनराव खरमाळे यांचे पुत्र यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन याचिका दाखल केल्याने 4 ऑगस्टला औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावल्या आहेत.
अहमदनगर येथील अशोक खोकराळे यांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी वडील बबनराव खोकराळे यांना घशात आणि पोटात दुखत असल्याने अहमदनगर कोविड सेंटर मनमाड रोड सावेडी येथे चेक करण्यासाठी गेले तेथे डॉ.सचिन पाडोळे यांना कॉल करून पाठवून दिले दुसर्‍या दिवशी वडिलांना घरी सोडतो सांगून डॉ.सचिन पाडोळे, डॉ.गोपाल बहिरूपी, डॉ.सुधीर बोरकर आणि इतर यांनी अशोक खोकराळे व इतर नातेवाईकांना कुठलीही कल्पना न देता 14 ऑगस्ट 2020 रोजी न्यूक्लिअस हॉस्पिटल बालिकाश्रम रोड सावेडी येथे वडील बबनराव खोकराळे यांना शिफ्ट केले
दुर्दैवाने 18 ऑगस्ट 2020 रोजी बबनराव खोकराळे यांचा न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अशोक खोकराळे यांना अहमदनगर कोविड सेंटर आणि न्यूक्लिअस हॉस्पिटल यांनी बबनराव खोकराळे यांच्यावर उपचार केलेल्या सर्व फाईल दिल्या त्यानंतर अशोक खोकराळे यांनी वडिलावर योग्य उपचार झालेत की नाही याकरिता काही त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांना वडिलांची उपचार केलेल्या फाईल दाखवल्या नंतर त्यामधील जे रिपोर्ट आहेत त्यावरून वडिलांवर चुकीचे उपचार झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी सांगितले तुमच्या वडिलांना कोरोना नसताना कोरोना वर उपचार केले असल्याचे रिपोर्ट वरून दिसून येत असल्याचे सिद्ध होत असल्यामुळे डॉक्टर्स यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे उपचार करणारे डॉक्टर्स तुमच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगितले
 वडिलांच्या सर्व उपचाराच्या फाईल घेऊन न्याय मागण्यासाठी मी आरोग्य मंत्री राजेश टोपे व अहमदनगर पोलीस प्रशासन, जिल्हा अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आयुक्त महानगरपालिका, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल इंडियन मेडिकल कौन्सिल या सर्व ठिकाणी तक्रार दाखल केली खोकराळे यांनी वडील बबनराव खोकराळे यांची कोरोना टेस्ट नगर मध्ये कुठल्या लॅब मध्ये झाली आहे का याची चौकशी चालू केली असता त्यांना बबनराव खोकराळे यांचे 13 ऑगस्ट 2020 व 14 ऑगस्ट 2020 रोजीचे कृष्णा लॅब विळद घाट विखे पाटील हॉस्पिटल येथे असे दोन कोरोना आरटीपीसीआर. रिपोर्ट झाल्याचे मिळाले
 रिपोर्टच्या बिलावरील मोबाईल नंबर अनोळखी असल्यामुळे अशोक खोकराळे यांनी दोन्ही नंबर वर कॉल करून विचारपूस केली असता एक योगेश उन्हाळे व दुसरा राजु सावंत यांची ते रिपोर्ट असल्याचे लक्षात आले त्या वरून अशोक खोकराळे यांची खात्री पटली की सदर रिपोर्ट हे वडिलांचे नसून इतर जाण्याचे आहे आणि हे वडिलांच्या नावाचे बोगस रिपोर्ट बनवण्यात आले आहे यावरून अशोक खोकराळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये 31 डिसेंबर 2020 रोजी बोगस कोरोना चाचणी रिपोर्ट बनवलयाच्याविरुद्ध कृष्णा लॅब आणि ज्यांनी हे खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूस न्यूक्लिअस हॉस्पिटल बालिकाश्रम रोड येथील डॉ गोपाल बहुरूपी, डॉ.सुधीर बोरकर तसेच अहमदनगर किविड केअर सेंटर मनमाड रोड सावेडी येथील डॉ.पाडोळे आणि इतर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजी अंड इम्युनोअसे लॅब बालिकाश्रम रोड येथील डॉ.मुकुंद तांदळे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत वर्षभर पाठपुरावा करून सुद्धा कुठेही प्रगती नसल्यामुळे तसेच बोगस कोरोना रिपोर्ट बनवण्याचे बाबत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात कोणतही प्रगती नसल्यामुळे अशोक खोकराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन याचिका रिट पिटीशन दाखल केलीअसता वरील सर्वांना 4 ऑगस्ट 2021 रोजी औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावल्या आहेत.

माझ्या वडिलांच्या मृत्यूस जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याशी हा माझा कायदेशीर लढा आहे आणि हा कायदेशीर लढा मी न्याय मिळेपर्यंत आणि असलेले दोषींना कायदेशीर शिक्षा होईपर्यंत चालू ठेवणार आहे वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक डॉक्टर यांना मी दैव रुपी मानतो ते सर्व देवाचं दुसरे रूप आहे परंतु अशा घटनेने या दैव रुपी क्षेत्राला बोटावर मोजण्या इतपत काहीजण काळीमा फासू इच्छित आहेत फक्त त्यांच्याच विरुद्ध कायदेशीर हा माझा लढा आहे.- अशोक खोकराळे

No comments:

Post a Comment