संजय गांधी निराधार योजनेतील किचकट अटी रद्द करा ः माळवदे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 31, 2021

संजय गांधी निराधार योजनेतील किचकट अटी रद्द करा ः माळवदे.

 संजय गांधी निराधार योजनेतील किचकट अटी रद्द करा ः माळवदे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः संजय गांधी निराधार योजनेतील किचकट अटींमुळे विधवांसह अनेक उपेक्षित लाभार्थी डोल पासून वंचीत रहात असून या योजनेतील किचकट अटी रद्द करण्यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन साकडे घातले असल्याचे नेवासा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संभाजीराजे माळवदे यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने विधवा परित्यक्ता,वृद्ध,अपंग यांना डोल दिला जातो महिन्याला एक हजार रुपये असे डोलचे अनुदान लाभार्थ्यांना मिळते मात्र यासाठी किचकट अटींमुळे सर्वसामान्य उपेक्षित लाभार्थी या योजनेपासून वंचीत असून संजय गांधी योजनांचा खरा आधार लाभार्थ्यांना मिळण्यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनीच आता पुढाकार घेऊन किचकट अटी रद्द करून डोलचा लाभ उपेक्षित घटकांना मिळण्यासाठी प्रयत्न करून तसेच आदेश करावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतांना दिसत आहे.
सदर डोलच्या प्रकरणात विधवा महिलेस जर अपत्य ही जय मुले असतील व ते वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केलेले असेल तर अशा विधवांचे डोल नामंजूर केले जाते
खरे पाहिले तर कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्यानंतर कुटुंबच हवालदिल झालेले असते मुले ही वयाच्या तीस वर्षापर्यंत शिक्षण घेत असतात
मात्र या योजनेत मुलगा पंचवीस वर्षाच्या पुढे असेल
तर त्या विधवा महिलेला संजय गांधी निराधार योजनेचा आधार मिळत नाही त्यांची प्रकरणे अपात्र ठरविली जातात तर दुसरीकडे एकवीस हजाराचा उत्पन्न दाखल्याची अट प्रकरणासाठी ठेवलेली आहे यात लाभार्थी अपंग असेल तर पन्नास हजार इतकी मर्यादा असते मात्र इतर लाभार्थ्यांना एकवीस हजार उत्पन्नाची अट ठेवलेली असते यात हा दाखला जरी लाभार्थ्यांना मिळवता आला तरी ती विधवा लाभार्थी मुले सज्ञान म्हणजेच पंचवीस वर्षाच्या पुढे असल्याने त्या विधवा लाभार्थी महिलेचे प्रकरण नामंजूर केले जाते अशी वस्तुस्थिती सद्या या योजनेसाठी आहे.
पंचवीस हजाराच्या पुढे उत्पन्नाची मर्यादा वाढवून मिळावी तसेच सज्ञान अपत्य ही अट रद्द करावी तरच या योजनेचा लाभ कुटुंब प्रमुख गेल्याने खर्‍या अर्थाने अधू झालेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळू शकेल यासाठी
किचकट अटी रद्द करून उपेक्षित वंचीत विधवा लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी
काँग्रेस कमिटीच्या वतीने दिलेल्या निवेदनात संभाजीराव माळवदे यांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जर शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला तर महाराष्ट्र राज्यातील सर्व वंचितांना याचा लाभ होणार आहे. यावेळी जिल्ह्याउपाध्यक्ष कार्लस साठे, संदीप मोटे, नेवासा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रंजन जाधव,  उपाध्यक्ष मुसाभाई बागवान ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश धनवटे, एनएसयुआयचे सौरभ कसावणे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here