बालभारती ने छापलेली लाखों पुस्तकं पडून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

बालभारती ने छापलेली लाखों पुस्तकं पडून.

 बालभारती ने छापलेली लाखों पुस्तकं पडून.

रद्दीत देण्यासाठी टेंडर.


पुणे-
मार्च 2020 पासून कोरोना मुळे शाळा बंद असताना बालभारती ने लाखों रुपयांची शालेय पुस्तके छापली. त्याची आता रद्दी झाली आहे. 426 मेट्रिक टन पुस्तके रद्दीत गेली असून ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढले आहे. पेपर मिल्सकडून टेंडर मागविण्यात आले आहे.  बालभारतीच्या नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून आहेत.  पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल इथल्या गोदामात ही पुस्तके पडून आहेत.
मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मात्र शाळा बंद असूनही बालभारतीने लाखो शालेय पुस्तके छापली आहेत.  शाळा बंद असूनही बालभारतीने पुस्तके का छापली ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  पुस्तके छापली, मात्र शाळा सुरू नसल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आली नाहीत. त्यामुळे ही सर्व पुस्तके बालभारतीच्या विविध गोदामांमध्ये पडून आहेत.

No comments:

Post a Comment