उड्डाणपुलाच्या साहित्याची चोरी.उड्डाणपुलाच्या साहित्याची चोरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

उड्डाणपुलाच्या साहित्याची चोरी.उड्डाणपुलाच्या साहित्याची चोरी.

 उड्डाणपुलाच्या साहित्याची चोरी.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असताना नगरकर उड्डाणपूल कधी सुरू होईल याची वाट पाहत असतानाच पुलावरील लोखंडी प्लेट चोरीला
गेल्या आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रदीप विकास बोरवा यांनी फिर्याद दिली आहे. छावणी परिषद जवळ ही घटना घडली असुन उड्डाणपुलासाठी लागणारे साहित्य हे आजूबाजूच्या परिसरामध्ये ठेवण्यात आले होते. तेथून 32 हून अधिक प्लेट या रात्रीच्या सुमाराला चोरीला गेल्या आहेत. सदरची बाब बोरवा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment