आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात..

 आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात..

चोरट्यांचा धुमाकूळ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः आ. रोहित पवार यांचा मतदार संघातील जामखेडमध्ये चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचकापाचक करून त्यातील एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. असून सध्या चोर्‍या, लूटमार, दरोडे, आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रात्रीच्या अंधारात होणार्‍या चोर्‍या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ लागली आहे.
भरदिवसा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. तर दुसरीकडे मारुती भगवान गंभीरे (वंजारवाडी) यांच्या खर्डा-सोनेगाव रस्त्यावर शेती अवजारे विक्रीच्या दुकानातून 43 हजार 360 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर, मोटरीची केबल, सबमर्सिबल केबल, तांब्याची वायडिंग तार व इलेक्ट्रिक वजनकाटा असा ऐवज चोरट्यांनी रात्री दुकानाचे शटर तोडून लंपास केला. त्यानंतर पोलिसांनी अहमदनगर येथून श्वानपथकाला पाचारण केले. परंतु सुगावा लागला नाही. वंजारवाडी व दरडवाडी या दोन्ही चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. सध्या जिल्ह्यात चोरटे सक्रिय झाले असून पोलीस प्रशासन निष्क्रिय झाले असल्याची जनभावना दिसून येत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment