मनोज झावरे पाटील यांची अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 28, 2021

मनोज झावरे पाटील यांची अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड..!

 मनोज झावरे पाटील यांची अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड..!

अन्याय व अत्याचार तसेच भ्रष्टाचार निर्मूलनासाठी पारनेर तालुक्यात उत्तम काम करणार :  मनोज झावरे पाटील


नगरी दवंडी
पारनेर - पारनेर तालुक्यातील वासुंदे गावचे सुपुत्र  मनराही ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन  मनोजभैय्या पोपटराव झावरे पाटील यांची  भारत सरकारच्या निती आयोगाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या 'अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया' च्या पारनेर तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मनोजभैय्या झावरे पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार व सर्वसामान्यांवर होत असलेला अन्याय अत्याचार तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासन  यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी काम केले जाते.
 अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी व सर्वसामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायासाठी या पुढील काळात पदाच्या माध्यमातून मी काम करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष मनोजभैय्या पोपटराव झावरे पाटील यांनी सांगितले. 
  दरम्यान मनोजभैय्या झावरे पाटील यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रशासन व व्यवस्थापन याचाही चांगला अभ्यास केलेला आहे.  युवकांच्या प्रश्नांवर तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काम केले असून त्यांच्या या कामाची अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने दखल घेण्यात आली असून त्यांना पारनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त करून  सामाजिक काम करण्याची एक प्रकारे चांगली संधी दिली आहे. 
 पारनेर तालुक्यात सर्व पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे असलेले मैत्रीचे संबंध तसेच एक युवक म्हणून समाजात असलेले त्यांचे एक चांगले स्थान निश्चितच पदाच्या माध्यमातून काम करत असताना या  सर्वसामान्य जनतेला मनोजभैय्या झावरे पाटील हे न्याय मिळून देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील असतील.
 युवक संघटनेच्या माध्यमातून काम करत असलेले कु. मनोजभैय्या झावरे पाटील अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात चांगले काम निश्चित उभे करतील.
 दरम्यान मनोजभैय्या झावरे पाटील यांची अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर  काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजितदादा तांबे पाटील, पारनेर तालुका काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष व वडगाव सावताळचे मा. उपसरपंच योगेशदादा शिंदे,  पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे पाटील, म्हसोबाझाप सरपंच प्रकाश गाजरे, उद्योजक प्रकाश चिकणे, खडकवाडी उपसरपंच अक्षय ढोकळे, पळशी मा. सरपंच संतोष जाधव, अजिंक्य गागरे,  दिलीप मोरे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ उगले, युवा नेते दत्तात्रय उर्फ बापूसाहेब साळुंके, गणेश गायकवाड, वडगाव सावताळचे मा. सरपंच राजू रोकडे, पत्रकार गणेश जगदाळे, यांनी निवडीबद्दल कु. मनोज भैय्या झावरे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. 
 दरम्यान अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव शर्मा, अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे नॅशनल डायरेक्टर नारायण सातपुते साहेब व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात कु. मनोजभैय्या झावरे पाटील हे काम करणार आहेत. 

अँटिकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात काम करत असताना संघटनात्मक भूमिका घेत अन्याय व अत्याचार निर्मूलन तसेच भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेऊन प्रशासन व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधत तालुक्यात यापुढील काळात काम करणार आहे.  संघटनेच्या बळकटीकरणासाठी पारनेर तालुक्यात संघटनेची चांगली टीम तयार करून सामाजिक विषयांवर व अन्याय अत्याचारावर प्रखरपणे यापुढील काळात काम करणार आहे.

No comments:

Post a Comment