सिटीमेडीकेअर एजन्सीचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

सिटीमेडीकेअर एजन्सीचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते

 पुणे येथील कात्रज कोंढवा रोडवरील सिटीकेअर हॉस्पिटलचे

सिटीमेडीकेअर एजन्सीचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः डॉक्टर उचाळे व डॉ जैस्वाल यांनी वैद्यकीय व्यवसाय करताना समाजाभिमुख काम केल्याने त्यांना चांगला जम बसवता आला असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी व्यक्त केले आहे.पुणे येथील कात्रज कोंढवा रोडवरील सिटीकेअर हॉस्पिटलचे संस्थापक/संचालक डॉ.सुनिल उचाळे व डॉ.चेतन जैस्वाल यांच्या सिटीमेडीकेअर एजन्सीचे उद्घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार श्री.योगेशआण्णा टिळेकर, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भाजपा श्री.जालींदरभाऊ कामठे,पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त मुख्य कार्यकारीअधिकारी प्रभाकर गावडे,जनता बँक संचालक श्री बिरूशेठ खोमणे,डॉ.प्रशांत आटोळे,डॉ.प्रियंका धुमाळ/चवरे मँडम,पुणे मनपा माजी उपायुक्त हनुमंत नाझीरकर, पुणे मनपा नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळेकर, नगरसेविका वृषालीताई कामठे,नगरसेविका वर्षाताई साठे,नगरसेवक विरसेनतात्या जगताप, सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ कदम, एल.आय.सी विकास अधिकारी संजय भाईक, उद्योजक राजुशेठ शिनारे, माजी प्राचार्य रभाजी खोमणे, श्री.भाऊसाहेब उचाळे पाटील, स्वीकृत नगरसेवक सतीशशेठ मारकड सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब कवडे,अक्षय थोरात,सुनिल कारंडे,केतन जैस्वाल,प्रा दिपक खैरे,प्रा.संभाजी साबळे व परिसरातील नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री भरणे यावेळी म्हणाले पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील डॉक्टर सुनिल उचाळे यांनी पुणे शहरात वैद्यकीय व्यवसायात स्थिरस्थावर होताना सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात काम केले.ग्रामीण भागातून आलेला युवक पुण्या सारख्या शहरात नावलौकिक मिळवतो ही अभिमानास्पद बाब आहे.डॉ.उचाळे व डॉ जैस्वाल यांनी वैद्यकीय व्यवसाय करताना सामाजिक सेवेला सातत्याने पाठबळ देण्याचे काम केले आहे.कोरोना महामारीने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. डॉक्टर हे देवदूतासारखे काम करीत असल्याने त्यांच्यावर सारी भिस्त अवलंबून असल्याने वैद्यकीय सेवा ही समाजसेवेचे व्रत असल्याचे मंत्री भरणे यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिपक खैरे यांनी तर आभार प्रा.संभाजी साबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment