रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन

दिगंबर राऊत याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याबाबत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घोडेगाव कौठा ता नेवासा येथील दिगंबर घनश्याम राऊत याच्या संशयित मृत्यू झाला असून सदर मृत्यूची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत महस्के, पवन भिंगारदिवे, दानिश शेख, पप्पू डोंगरे, जहीर सय्यद, राहुल बनकर, अक्षय बरकसे आदी उपस्थित होते.   7 जुलै रोजी शेतामध्ये विहिरीत पडून मृत्यू झाला आहे परंतु सदर मृत्यू हा आत्महत्या नसून संशयित स्वरूपाचा असल्याचे जाणवत दिगंबर हा त्यांच्या मृत्युच्या आधी कोणत्याही मानसिक त्रास मध्ये नव्हता आणि त्याला कोणता त्रास आहे त्याने हे त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना कधीच बोलला नाही व त्या बाबतीत कोणतीही शंका देखील नाही मग त्याने आपला जीव का म्हणून दिला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो एमआयडीसी येथे कंपनीमध्ये कामाला होता त्यांच्या मरण्याच्या दिवशी त्याने स्वतः मित्रांना फोन करून सांगितले की मी पंधरा मिनिटांमध्ये कामावर येत आहे त्यावेळी त्याने काहीच सांगितले नाही व तो एकदम व्यवस्थित बोलला त्याच्या बोलण्यातून तो कोणत्याच त्रासात आहे जाणवले नाही त्यानंतर त्याचा फोन सारखा व्यस्त लागल्याने त्याला परत मित्रांनी फोन केला नाही व दिगंबर राऊत याच्या लहान भावाने राहुल (पप्पु)ला सांगितले की दिगंबर खूप वेळापासून घरी आला नाही व त्यांच्या शेतातील विहिरी जवळ ची जागा थोडी घसरलेली दिसत आहे आणि त्याचा फोन बंद आहे  त्यांचे सर्व मित्र व नातेवाईक विहिरीजवळ जमले व मित्र राहुल(पप्पु) हा विहिरीमध्ये उतरला पण विहिरींमध्ये पाणी खूप झाल्याने त्याला तो मिळून आला नाही मग त्या विहिरीचे पाणी उपसल्यावर  राहूल(पप्पू) हा कमरेचा दोर बांधून विहिरीत उतरला असता त्याला दिगंबर हा दुसर्या दिवशी मिळून आला पण तो इतक्या वेळ पाणी मध्ये असून देखील त्याचे शरीर फुले अथवा खराब झाले नाही त्यावेळी त्यांच्या खिशात त्याचे पाकीट व मोबाईल मिळून आला पण त्या ठिकाणी कुठेही त्याची चप्पल मिळाली नाही कारण चप्पल त्याच्या पायात अथवा विहिरीच्या जवळ पास असती तर त्याला वेळेतच वाचवता आले असते त्याची चप्पल कुठेतरी फेकून दिली असावी असा दाट संशय आहे त्याला पाण्याची खूप भीती वाटायची हे सर्वांना माहीत होते म्हणून त्याला मुद्दाम पाण्यात टाकून मारण्यात आले असावे पण त्याच्याकडे कोणतीच चीट्टी व त्याने त्याच्या मोबाईलवरून कोणाला साधा मेसेज देखील केलं नाही मग त्याने आपला जीव का दिला आहे हे स्पष्ट होतच नाही राहुल(प्पपु) डोंगरे व त्यांच्या सर्व मित्रांना संपूर्ण खात्री आहे की दिगंबर यांनी आत्महत्या केली नसून त्याला मारण्यात आले आहे म्हणून दिगंबर घनश्याम राऊत यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्याला न्याय मिळवून द्यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment