नगर शहर व तालुका युवा सेनेची पुरग्रस्तांसाठी महाडला मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 6, 2021

नगर शहर व तालुका युवा सेनेची पुरग्रस्तांसाठी महाडला मदत

 नगर शहर व तालुका युवा सेनेची पुरग्रस्तांसाठी महाडला मदत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाड येथील पुरग्रस्त बांधवांसाठी  नगर शहर व तालुका युवा सेनेच्या वतीने अन्नपदार्थ, जीवनावश्यक वस्तू, औषधांची मदत करण्यात आली. यावेळी  युवासेना नगर शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, उपशहर प्रमुख  मंगेश शिंदे, शेखर सावंत व शिवसेना प्रतीक उदटे, संग्राम केदार, शिवम खंडागळे, अनिकेत ठोकळ, प्रशांत अंबेडकर, किरण टोकळ, सचिन ठोकळ, अमोल फलके, अजय ठणगे, रोहन भुजबळ सहकारी मित्र व युवासेना मित्र परीवार उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रेरणेतुन  या उपक्रमासाठी शिवसेना नेते राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब व महाडचे आमदार भरत गोगावले यांचे मार्गदर्शन व सहाय्य लाभले. महाड तालुक्यातील म्होप्रे गावात मदत पोहच झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, युवा सेना संपर्क अधिकारी राहुल कदम, युवा सेना विभाग अधिकारी नरेश पिंगळे, शाखा प्रमुख सोमाजी पाटील यांनी सदर मदत पुरग्रस्तांना वाटप केली. यावेळी नगर युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here