उपविभागीय अभियंता सागर कोतकरांवर राजकीय वरदस्त असल्याचा आरोप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

उपविभागीय अभियंता सागर कोतकरांवर राजकीय वरदस्त असल्याचा आरोप.

 उपविभागीय अभियंता सागर कोतकरांवर राजकीय वरदस्त असल्याचा आरोप.

सार्वजनिक बांधकामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात वंचितचे आमरण उपोषण सुरू.

ना दखल... ना चर्चा...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग शाखा अभियंता श्री सागर कोतकर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा व तत्काळ निलंबन करावे या मागणीकरिता दिनांक 5 ऑगस्ट पासून अहमदनगर वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव योगेश साठे हे आमरण उपोषणासाठी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या कार्यालय येथे बसले असून आमरण उपोषणास दोन दिवस होऊन देखील संबंधित कार्यालयाने कोणत्याही प्रकारची तसदी घेतली नाही, कोणताही अधिकारी या विषयावर चर्चा करण्यास आले नाही. श्री सागर कोतकर यांचा प्रशासकीय व राजकीय वरदहस्त पाहता योगेश साठे यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही.
योगेश साठे उपोषणास बसू नये म्हणून दिनांक 3 ऑगस्ट रोजी गुंडाकरवी  योगेश साठे यांना रस्त्यात आडून धमकी देऊन बेसबॉल च दांड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न करीत गाडीचे नुकसान करीत मोबाइलही फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. योगेश साठे यांच्या जीवितास धोका झाल्यास सागर कोतकर सह प्रशासकीय अधिकार्‍यांवर व सागर कोतकर यांच्यावर राजकीय वरदहस्त असणार्‍या लोकांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.सबजेल, नवीन जिल्हा न्यायालय,सैनिक लोन पराग बिल्डींग समोरील तात्पुरते कारागृह या इमारतीचे दुरुस्तीसाठी कारागृह योजनेअंतर्गत सण 2019 20 राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून अनुदान देण्यात आले आहे. कारागृहात कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद्याना ठेवण्यासाठी नवविद्या प्रसारक मंडळाची कन्या शाळा माळीवाडा (अहमदनगर जिल्हा कारागृह जवळ तथा सबजेल) या इमारतीस तात्पुरते कारागृह तसेच सैनिक लॉन्स पराग बिल्डींग समोर आणि नूतन जिल्हा न्यायालय येथे दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात आली आहे या इमारतीत दुरुस्ती कामात ग्रील पार्टीशियन, ग्रील डोअर, लोखंडी जाळी, टॉयलेट, झतउ डोअर, जी आय, यासारखे इतर दुरुस्ती काम दाखवून  तत्कालीन प्रभारी पोलीस अधीक्षक श्री सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर. संदिप नचित अप्पर जिल्हा दंडाधिकारी, संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी, उमेश पाटील तहसीलदार, सावंत अधीक्षक जिल्हा कारागृह, एस जी गायकवाड उपविभागीय अभियंता बांधकाम उपविभाग, शामकांत शेंडगे कारागृह निरीक्षक जिल्हा कारागृह अहमदनगर, दिवान तहसीलदार गृह शाखा यांनी दिलेल्या निर्देशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी मा.अधीक्षक अहमदनगर जिल्हा कारागृह यांच्या विनंती नुसार तात्पुरते कारागृह नव विद्या प्रसारक मंडळाचे कन्या शाळा येथील कारागृह योजनेअंतर्गत सन 2019 20 मध्ये 19 लाख रुपयांचे काम कागदोपत्री दाखविण्यात आले आहे.
अंदाजपत्रकात दर्शविलेल्या मोज मापानुसार सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे आणि दर्शविलेल्या (19 लाख) रकमेपेक्षा कमी रकमेत झालेले आढळून येते तसेच सैनिक लॉन पराग बिल्डिंग समोरील नागपूर ते कारागृह आणि नवीन जिल्हा न्यायालय येथेदेखील कामकाज गुणवत्ता हीन निकृष्ट दर्जाचे दिसून येते सदरील कामात प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांचेही आर्थिक हितसंबंध असल्याचे शंका उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली आहे. हे अमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या नेतृत्वाखाली चालू असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सह जिल्हा संघटक फिरोज पठाण, मनोज कर्डिले,विश्वभूषण गायकवाड,अमर निरभवणे मारुती पाटोळे संतोष अल्लाट अतुल आखाडे, वाहिद पठाण,दत्तात्रेय आडबले,हरीश चक्रनारायण, प्रवीण आल्हाट,सतीश चाबुकस्वार,हर्षवर्धन देशमुख यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

No comments:

Post a Comment