महिलेच्या गळ्यातील चैन ओढून 2 अज्ञात फरार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

महिलेच्या गळ्यातील चैन ओढून 2 अज्ञात फरार.

 महिलेच्या गळ्यातील चैन ओढून 2 अज्ञात फरार.

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शोभा भास्कर झावरे वय 57 या सावेडी परिसरातील गुलमोहर रोडवरील आपल्या निर्जन बंगल्या जवळ असतानाच बाईक वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे गळ्यातील पावणेतीन तोळ्याची गळ्यातील चेन ओढुन ‘धूम’ ठोकली. झावरे यांनी तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे हे आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज आहे का? रेकॉर्डवरील गुन्हेगार यात सामील नाही ना याचा तपास करीत आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसांगणिक छोटे-मोठ्या गुन्हेगारीच्या घटना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांत चोर्‍या, पतसंस्था, बेकरीसह घरफोडी, व्यापार्‍याची भररस्त्यात पाच लाख रुपये लुटणे असे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यात चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्रासपणे अधूनमधून घडत आहेत. पाळत ठेवून लूटमारीचे गुन्हे घडत असताना पोलिसांना मात्र संशयित, गुन्हेगार सापडत नाहीत.

No comments:

Post a Comment