मोहरम निमित्त बारा इमाम कोटलाला काँग्रेसच्या वतीने चादर अर्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 20, 2021

मोहरम निमित्त बारा इमाम कोटलाला काँग्रेसच्या वतीने चादर अर्पण

 मोहरम निमित्त बारा इमाम कोटलाला काँग्रेसच्या वतीने चादर अर्पण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खलीलभाई सय्यद उपस्थित होते.
कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करीत यावेळी काँग्रेसच्या वतीने चादर चढविण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिसभाई चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इम्रानभाई बागवान, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, महिला सेवादल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कौसर खान महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, माजी नगरसेविका जरीना पठाण, कमलताई ढगे, संगीता पीसोटे, शहर जिल्हा सचिव गणेश खापरे, राहुल गांधी विचार मंचाचे शहर अध्यक्ष सागर ईरमल, नईमभाई शेख आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मोहरम हे एकात्मिकतेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्यानिमित्तानं शहरामध्ये सर्व धर्मीयांमध्ये असते. दर वर्षी या निमित्ताने सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी येथे होत असते. मात्र कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. यामुळे अनेक मर्यादा या वर्षी आलेल्या आले आहेत. भाविकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. खलील सय्यद यावेळी म्हणाले की, मोहरमच्या निमित्तानं नगर शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये घडत आहे. यावेळी बारा ईमाम कोठल्याचे मुजावर नादिर सर हे देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here