शांततेत मोहरम विसर्जन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

शांततेत मोहरम विसर्जन.

 शांततेत मोहरम विसर्जन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये मोहरम उत्सव हा प्रथेप्रमाणे दर वर्षी साजरा केला जातो. यंदा मात्र करोनाची लाट असल्यामुळे कोठला परिसरात असलेल्या कोठला मैदानामध्ये हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला, काल गुरुवारी कत्तल रात्र होती. छोटे इमाम  मिरवणूक काढण्यात आली व सवारी ची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी असलेले ट्रस्टी व प्रतिष्ठित नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. काल कत्तलीची रात्र पार पडल्यानंतर आज मोहरम विसर्जन पार पडले, यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल रात्री अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी सवारी वर फुलांची चादर अर्पण केली तसेच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा या ठिकाणी घेऊन सवारी ते दर्शन घेऊन चादर अर्पण केली. काल रात्री बारा वाजता मिरवणुकीला प्रारंभ होऊन साडेबारा वाजता सवारी  स्थापना करण्यात आली ,यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलिस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह अधिकार्‍यांनी या ठिकाणी सावरी ला सादर अर्पण केली. सवारी विसर्जन मिरवणूक कोविड मुळे होऊ शकली नाही त्यामुळे याच परिसरामध्ये असलेल्या सवारी ज्या ठिकाणी बसवली त्या ठिकाणी आज सवारी विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली होती, दुपारी साडेबारा वाजता जागेवरच सवारी चे विसर्जन हे करण्यात आले. मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता सवारी चे दर्शन या वेळी सर्वांनी घेतले जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली. विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग सुरु ठेवले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे . यावेळी तोफ खानाचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी मोहरम हे शांततेत पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले व जनतेचे त्यांनी आभार मानले.
प्रथेप्रमाणे मोहरम सण हा नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, गेल्या दीड वर्षापासून सर्वत्र कोविडचे  वातावरण असल्यामुळे अनेक सण, उत्सवांना निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्यामुळे यंदा स्थनिक पातळीवर साधेपणाने उत्सव साजरे करावे असे निर्देश देण्यात आले होते.

No comments:

Post a Comment