कोरोनाचा उद्रेक 24 तासात 1155 कोरोना पॉझिटिव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

कोरोनाचा उद्रेक 24 तासात 1155 कोरोना पॉझिटिव.

 कोरोनाचा उद्रेक 24 तासात 1155 कोरोना पॉझिटिव.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आज उद्रेक झाला आहे. आज जिल्ह्यात 24 तासात तब्बल 1155 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगर जिल्ह्याची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी कमी जास्त होत असतांना आज कोरोना बाधितांच्या आकड्याचा विस्फोट झाला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 162, पारनेर 137, शेवगाव 112 तर इतर तालुके शंभरच्या आत आले आहेत. मात्र राहाता तालुका वगळता इतर तालुक्यातील आकडेवारीत वाढ झाली आहे. आज अचानक वाढलेल्या आकडेवारीने चिंता वाढली आहे.
राज्य शासनाने दि. 15 ऑगस्ट पासून निर्बंध शिथील करण्याची घोषणा करत नव्याने निर्बंधाचे नियम काल जाहीर केले. मात्र त्यानंतर दुसर्याच दिवशी नागरिकांच्या बेजबाबदार पणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित आकड्याचा उद्रेक झाला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 270, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 524 तर अँटीजेन चाचणीत 361 असे 1155 कोरोना बाधित आढळून आले. आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 162, पारनेर 137, शेवगाव 112, अकोले 95, नगर ग्रामीण 91, श्रीगोंदा 84, पाथर्डी 72, कर्जत 71, जामखेड 68, राहुरी 60, श्रीरामपूर 48, नेवासा 45, नगर शहर 35, राहाता 31, कोपरगाव 28, इतर जिल्हा 15, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

No comments:

Post a Comment