ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दुःखद निधन. हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर तारा निखळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दुःखद निधन. हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर तारा निखळला.

 ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दुःखद निधन. हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर तारा निखळला.


मुंबई -
हिंदी सिनेमा सृष्टीतील अभिनयाचा सुपस्टार एक अजरामर दिलीप कुमार नावाचा तारा निखळला. वयाच्या 98 व्या वर्षी आज सकाळी 7.30 वाजता मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. बॉलिवूड विश्वात 50 च्या दशकात आपली कारकिर्द घडवणारा रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दिग्गज अभिनेता हरपल्याने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांना 30 जुन रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्नालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले होते. आता दिलीप कुमार यांचे पार्थिव रुग्नालयातून घरी नेण्यात येत आहे. यादरम्यान दिलीप कुमार यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांची पत्नी सायरा बोनो यांची साथ लाभली. प्रत्येक क्षणी त्यांनी दिलीप कुमार यांना पाठींबा दिला. सांताक्रुज मुंबईतील जुहू कब्रिस्तनमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांना दफन करण्यात  येणार आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांउटवरुन याची माहिती देण्यात आली आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तने संपुर्ण जगात खळबळ उडाली तसेच दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकारणी मंडळी तसेच दिग्गज कलाकारांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतकचं नाही तर अनेक  कलाकार दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरीता त्यांच्या घरी पोहोचले आहेत. जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 साली झाला होता. दिलीप कुमार यांनी पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत कामगिरी केली आहे. याचदरम्यान, 50 च्या दशकांतील अनेक बड्या नायिकेंसह त्यांचे नाव जोडले गेले. मधुमती, मधूबाला यांच्यासोबतचे त्यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले. शेवटी दिलीप कुमार यांनी त्यांच्या वयापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सायरा बानो हिच्याशी लग्न केले.

No comments:

Post a Comment