नाथा भाऊंचा जावई ‘ईडी’ च्या जाळ्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

नाथा भाऊंचा जावई ‘ईडी’ च्या जाळ्यात.

 नाथा भाऊंचा जावई ‘ईडी’ च्या जाळ्यात.


जळगाव -
सार्वजनिक जीवनात फारसे समोर न दिसणारे एकनाथ खडसेंचे मोठे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ताब्यात घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर खडसेंची ज्येष्ठ कन्या आणि जावई हे सार्वजनिक जीवनात कधीही सक्रीय असलेले दिसले नाहीत. विशेषत: गिरीश चौधरी हे अत्यंत ’लो-प्रोफाईल’ असताना ईडीने केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत आहे. ते या प्रकरणात अडकले कसे? याची चर्चा सुरू झाली आहे.एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गिरीश दयाराम चौधरी हे मूळचे ममुराबाद (ता. जळगाव) येथील रहिवासी आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची थोरली कन्या शारदा यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. विवाहानंतर हे दाम्पत्य अनेक वर्षे विदेशात होते. ते तिकडेच स्थायिक झाले होते. त्याचे ममुराबाद याठिकणी एक जुने घर व शेती आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांच्याकडे महसूलसह तब्बल 12 खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी आली. यानंतर चौधरी दाम्पत्य हे भारतात आले. तेव्हापासून त्यांचा इकडचा मुक्काम वाढला. याच कालावधीत गिरीश चौधरी यांनी आपल्या सासूबाई मंदाताई खडसे यांच्या सोबत भोसरी औद्योगिक वसाहतीला लागून असणारी तीन एकर जमीन घेतली. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती प्रत्यक्षात खूप कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर ईडीला अचानक यात भ्रष्टाचार असल्याचा साक्षात्कार झाला. यातून आता गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यथावकाश यातील कारवाईचे सोपस्कार पार पडतीलच. तथापि, या प्रकरणातील त्यांचा समावेश हा खूप आश्चर्यकारक असाच आहे.
एकनाथ खडसे यांनी आपले जावई हे अनिवासी भारतीय असून त्यांनी भोसरी येथील तो भूखंड नियमानुसार खरेदी केला असल्याचा युक्तीवाद वारंवार केला आहे. हा व्यवहार करण्याची आर्थिक सक्षमता आपले तसेच जावयाचे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीही एका व्यवहारामुळे नाथाभाऊंचा हा कर्तबगार जावई ईडीच्या जाळ्यात अडकला आहे.

No comments:

Post a Comment