कल्याण रोड पाणी प्रश्नाची महापौरांकडून दखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

कल्याण रोड पाणी प्रश्नाची महापौरांकडून दखल.

 कल्याण रोड पाणी प्रश्नाची महापौरांकडून दखल. पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक संपन्न.

15 ऑगस्टला नगर कल्याण रोडवरील पाण्याची टाकी भरून जलपूजन करून लोकार्पण करणार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नव्या महापौर रोहीणी शेंडगे या नगर-कल्याण परिसरातील प्रतिनिधी असल्यामुळे या परिसरातील पाणी प्रश्नाची त्यांना जाण आहे. या भागात गोरगरीब व नोकर वर्ग असून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागते. याचा विशेषतः महिलांना खूप त्रास होतो. या भागात पाण्याची टाकी आहे ,पण टाकीत पूर्ण दाबाने पाणी येत नसल्याची दखल महापौर शेंडगे ताईंनी घेतली असून शिवाजीनगर भागातील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरून येत्या 15 ऑगस्टला पाण्याचे जलपूजन करून या टाकीचे लोकार्पण करणार असल्याची माहिती दिली.
अहमदनगर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे व उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी घेतली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले की, शहरा जवळच्या कल्याण रोड परिसरातील रहिवाशी लोकसंख्येचा मोठा भाग असून या भागामध्ये गोरगरिब नागरिक व नोकरवर्ग मोठया प्रमाणात राहत असून या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत सदर परिसरामध्ये पाणी अवेळी  व कमी दाबाने 10 ते  12 दिवसानंतर मिळते. नागरिकांना रात्री अपरात्री पाण्यासाठी जागे रहावे लागते. विशेषत: महिला वर्गाला याचा खूप त्रास होतो. शिवाजी नगरला पाण्याची टाकी बांधलेली असून सदर टाकीसाठी पाईप लाईन टाकलेली आहे. परंतु ग्रॅवीटीने टाकी भरत नसल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सदर ठिकाणी संपवेल बांधणे कामाचे निविदा प्रक्रिया चालू असून  ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल.  बायपास वरून पाणी पुरवठा का केला जात नाही याबाबत देखील माहिती घेतली. याचबरोबर शहरातील मध्यवस्तीतील भाग, उपनगरातील काही भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. याबाबत फिटर ,हेड व्हॉलमन यांनी याबाबत काय समस्या असतील तर त्या सोडून पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होईल यादृष्टिने कार्यवाही करावी. व्हॉलमन यांनी देखील शहर व उपनगरातील नागरिकांना एकसारखा पाणी पुरवठा होईल यादृष्टिने काळजीपुर्वक कामकाज करावे असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी सांगितले की, शांतीनगर, समर्थ नगर, या पाणीच्या टाकीमधून या परिसरामध्ये सुध्दा पाणी पुरवठा लवकरच केला जाईल. पाणी पुरवठा विभागामार्फत कोठे कामे चालू आहेत, याची माहिती घेतली या योजनेच्या कामामुळे शहराला जास्तीचा पाणी पुरवठा होणार असून अनेक वर्षापासूनची नगर शहराची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामाची यावेळी माहिती घेतली.
यावेळी माजी उपमहापौर मा.श्री.अनिल बोरूडे, मा.श्री.संभाजी कदम, नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे,  मा.श्री.गणेश कवडे,मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.प्रशांत गायकवाड, मा.श्री.दत्ता जाधव, मा.श्री.संतोष गेणाप्पा, उपायुक्त मा.श्री.यशवंत डांगे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे ,मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.दत्ता जाधव, माजी उपमहापौर मा.श्री.अनिल बोरूडे यांनी शिवाजी नगर कल्याण रोड आदी भागातील पाण्याच्या प्रश्नाबाबत चर्चेमध्ये भाग घेतला.

No comments:

Post a Comment