पोलीसांनी पकडला लाखो रुपयांचा गुटखा, 10 गोण्या जप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

पोलीसांनी पकडला लाखो रुपयांचा गुटखा, 10 गोण्या जप्त

 पोलीसांनी पकडला लाखो रुपयांचा गुटखा, 10 गोण्या जप्त


श्रीगोंदा -
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यांकनाथ येथील किराणा दुकानात श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून लाखो रुपयांचा तंबाखू आणि सुपारीचा सुमारे 10 गोण्या गुटखा जप्त करण्यात आला.
या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील किराणा दुकानात गुटख्याचा मोठा साठा केला असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना रात्री उशिरा मिळाली त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गट यांना त्याठीकानी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलिस उपनिरीक्षक गट यांनी लगेच पोलीस कर्मचार्‍यांसह किराणा दुकानात छापा टाकला असता त्या ठिकाणी असलेला तंबाखू आणि सुपारीचा सुमारे 10 गोण्या गुटखा जप्त करत कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत संबंधित किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

No comments:

Post a Comment