सकल नाभिक समाजाच्या वतीने केश शिल्पी बोर्ड पूनर्गठीत करण्यासाठी नवाब मलिक यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

सकल नाभिक समाजाच्या वतीने केश शिल्पी बोर्ड पूनर्गठीत करण्यासाठी नवाब मलिक यांना निवेदन

 सकल नाभिक समाजाच्या वतीने केश शिल्पी बोर्ड पूनर्गठीत करण्यासाठी नवाब मलिक यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राष्ट्रीय जनसेवा पक्षा द्वारे सकल नाभिक समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्ष प्रवक्ते आणि राज्याचे अल्प संख्यांख विकास मंत्री नवाब मलिक साहेब यांना केश शिल्पी बोर्ड पूनर्गठीत करण्या संबंधीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित साहेब, सह सचिव राजीव भट साहेब आणि प्रदेश सल्लागार श्री शेखर भोर(काका) व मुबई समन्वयक राम कुमार वर्मा साहेब उपस्थित होते. लॉकडाऊन दरम्यान नाभिक समाजाचे झालेले हाल, समाजातील आत्महत्या आणि समाजातील सलून तथा ब्युटी पार्लर व्यवसायिक व सलून कामगार यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर सकल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी इतर राज्यांप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातही लवकरात लवकर मागील सरकारने गठित केलेल्या केश शिल्पी बोर्डाचे पूनर्गठन करावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली. नवाब मलिक साहेबांनी सर्व विषय बारकाईने समजून घेतले. व मा.कामगार मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सलून कामगार व समाज विकासासाठी केश शिल्पी बोर्ड पुनर्गठन करण्यासाठी शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरच नाभिक समाजाच्या हिताचा निर्णय घेऊ असे सांगितले.

No comments:

Post a Comment