इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

 इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन


अहमदनगर -
भारत सरकार संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ह्युमन राईटचे  जिल्हा चेअरमन प्रा.पंकज लोखंडे, कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे, शरद महापुरे, सदीप (नाना) कापडे, अनिल गायकवाड, सदीप ठोबे, विजय दुबे, संतोष वाघ, प्रविण खेडकर, भगवान जगताप, संजोत मकासरे आदींसह ह्युमन राईटचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा चेअरमन प्रा.पंकज लोखंडे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी दीन, दलित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्य केले. महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अग्रगण्य कार्य करुन दीन-दुबळ्यांना त्यांच्या हक्काप्रती जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले. समाजाच्या कल्याणासाठी व उध्दारासाठी अण्णाभाऊंचे विचार दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अतुलनीय आहे. दीन-दुबळ्यांना न्याय, हक्कासाठी संघर्ष करण्याचे शिकवले. आपल्या साहित्य व शाहीरीतून वंचितांना बळ देण्याचे कार्य केले. त्यांचे विचार आजही अन्यायाविरोधात स्फुर्ती देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment