डॉक्टरांच्या जागृकतेमुळे आगळ्यावेगळ्या स्पुनबील पक्ष्याला मिळाले तातडीने उपचार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

डॉक्टरांच्या जागृकतेमुळे आगळ्यावेगळ्या स्पुनबील पक्ष्याला मिळाले तातडीने उपचार

 डॉक्टरांच्या जागृकतेमुळे आगळ्यावेगळ्या स्पुनबील पक्ष्याला मिळाले तातडीने उपचार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरजवळील डोंगरगण परिसरात सायंकाळी डॉ.पंकज मते हे भ्रमंतीसाठी गेले असताना त्यांना पाणथळ व झुडुपांच्या भागात काहीतरी फडफडत असल्याचे दिसले.पक्षीनिरीक्षणाचा छंद असल्याने तो एक पक्षीच असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.अंधार होत आला सर्व पक्षी परतले तरी हा पक्षी मात्र का तिथेच राहीला असावा हा प्रश्न त्यांना पडला.
तिथपर्यंत पोहचणे खुप कठीण असले तरी डॉ.मते मोठ्या कष्टाने तिथे पोहचले त्यावेळी तो एक स्पुनबील अर्थात चमच्यापक्षी असल्याचे त्यांना आढळले.तारेत अडकल्याने त्याचे पंखाला प्रचंड मोठी जखम झाली होती.त्यांनी त्यातुन त्याची अलगद सुटका करुन आपल्या गाडीत ठेवले व पक्षीमित्र श्री.अजिंक्य सुपेकर यांच्याशी संपर्क केला.सुपेकर यांच्या मार्गदर्शनानुसार दोघांनी त्या पक्षास निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाच्या श्री.जयराम सातपुते यांच्याकडे रात्री नऊच्या सुमारास दाखल केले.
तिथे श्री.जयराम सातपुते व रूषीकेश परदेशी यांनी त्याच्यावर तातडीने प्रथमोपचार करून रक्तप्रवाह थांबवला.त्यानंतर  पिपल फॉर अ‍ॅनिमल च्या डॉ. स्वप्निल साखरे व लक्ष्मण साखरे यांनीही त्यावर उपचार केले,सलाईन व औषधोपचाराने ते सकाळपर्यंत ऊर्जावान झाले असले तरी पंखांच्या हाडांमध्ये झालेली जखम ही गंभीर असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने श्री.सातपुते यांनी वनविभागास कळविले.दुसर्या दिवशी दुपारपर्यंत वनविभाग अहमदनगर चे वनपरिक्षेञ अधिकारी श्री.सुनिल थेटे व श्री.पोकळे,वनपाल श्री.अशोक शर्माळे,वनरक्षक श्री.सय्यद आदींच्या पथकाने समक्ष येवुन जखमी पक्षाची पाहणी केली व शासकीय वाहनातुन पशुवैद्यकिय दवाखाण्यात नेले.तिथे डॉ.श्री.शशीकांत कारखेले यांनी त्याची तपासणी करून त्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली.स्पुनबीलच्या तब्येतील आता हळुहळु सुधारणाही होत आहे.लवकरच तो आकाशात भरारी घेईल अशी अपेक्षा आहे.
डॉ. मतेच्या विशेष प्रयत्नांमुळेच या पक्षावर यशस्वी उपचार करता आले,त्यामुळे निसर्गप्रेमी वर्तुळातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
काळी पिवळ्या रंगाच्या चमच्याच्या आकाराच्या वैशिष्ट्यपुर्ण चोचीमुळे या पक्षास स्पुनबील म्हणजेच चमच्यापक्षी असे नाव पडले आहे.याची उंची 60 सेमी पेक्षा जास्त असते.सर्व भारतीय उपखंडात हा पक्षी कमी -अधीक संख्येने आढळुन येतो.मुख्यत: भारताच्या दक्षीण भागातील पानथळ ठिकाणी उंच झाडांवर काटक्यांचे घरटे करून त्यात जुलै ते नोव्हेंबर या काळात अंडी घालतो.

No comments:

Post a Comment