अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग; युवतीचा हनी ट्रॅप. गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग; युवतीचा हनी ट्रॅप. गुन्हा दाखल.

 अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग; युवतीचा हनी ट्रॅप. गुन्हा दाखल.

बागायतदाराला मागितली दोन लाखांची खंडणी!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मैत्री.. मैत्रीतून अश्लील फोटो शेअर..नी. नंतर पैशासाठी ब्लॅकमेलिंग.. खंडणी.. आणि हनीट्रॅपचा हा नवा फंडा कमी काळात मोठे आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा मार्ग झाला आहे. वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या एका तरुणीने बागायतदाराचं सावज शोधलं. बागायतदार मोठा चतुर दोन लाखाचा चेक देऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात या युवती विरोधात तक्रार दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या बागायतदारांने फिर्याद दिल्याने पोलिसांनी त्या ट्रॅपवाल्या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नगर तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हनीट्रॅपची एक टोळी उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात हनीट्रॅपच्या घटना घडल्या. आणि आता पुन्हा नगरमध्ये हनीट्रॅपची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीला अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
गुन्हा दाखल झाल्यामध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा पती व त्यांचा पाथर्डी तालुक्यातील एका पंटरचा समावेश आहे. ते सध्या पसार झाले असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तरूणीने त्या बागायतदाराला फोन करून त्याच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून तीने त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. 15 जून रोजी सायंकाळी बागायतदाराला घरी बोलून घेतले. ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा पती आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटरला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी त्याची फिर्याद दाखल करून घेतली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करत आहे.
42 वर्षीय इसमाच्या फिर्यादीवरून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी महिलेसह तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 42 वर्षीय बागायतदार हे  पाथर्डी तालुक्यातील आहेत. ते शेतीसह पेंटींगचा व्यावसाय करतात. आरोपींमध्ये संबंधित महिला, किरण खर्डे (दोघेही रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) आणि गणेश छगन गिर्हे (रा. राघेहिवरे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे. तीघे आरोपी फरार असून एमआयडीसी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी गणेश गिर्हे हा बागायतदार यांच्या ओळखीचा आहे. आरोपी गिर्हे याने हनीट्रॅप करणारी महिला आरोपीला बागायतदार यांचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर संबंधित महिलेने बागायतदार यांच्या मोबाईलवर पहिल्यांदा मिसकॉल केला असता बागायतदार यांनी तिला फोन केला. त्यानंतर फोनवर बागायतदार आणि महिला असे दोघांचे बोलणे होत असे. एके दिवशी महिलेने बागायतदार यांना फोन करून मी तुम्हाला वडगाव गुप्ता परिसरात पेंटींगचे मोठे काम देते, असे सांगून बोलावून घेतले. तसेच मी कोर्टात कामाला असल्याचे देखील बागायतदार यांना सांगितले. मोठे काम मिळणार असल्याने बागायतदार तिच्या घरी आले असता त्यावेळी महिलेने बागायतदारी यांच्याशी जवळीक साधत फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बागायतदार यांना ब्लॉकमेल करून दि. 15 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी बोलवले. त्यावेळी बागायतदार तिच्या घरी गेले असता तिचा पती आरोपी किरण खर्डे याने बिागायतदार आणि महिला यांना एकत्र पकडले, असे बागायतदाराला भासवण्यात आले. त्यानंतर बागायतदार यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदार यांच्याजवळील पाच हजार रूपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आली. हा सर्व प्रकार आरोपी महिला आणि तिचा पती किरण या दोघांनी बागायतदार यांना ओळखत असलेला आरोपी गणेश गिर्हे याला सांगून मध्यस्थी करण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर दि. 16 जून रोजी आरोपी गणेश गिर्हे याने दोन लाख रूपयांचे प्रत्येकी तीन चेक घेतले. त्यातील एका चेकवरील दोन लाख रूपये आरोपींना मिळाले असून दोन चेकवरील चार लाख रूपये अद्यापपर्यत मिळाले नाहीत. मात्र हे दोन चेक आरोपींकडेच आहेत. आरोपींनी बागायतदार यांच्याकडून दोन लाख पाच हजार रूपये काढून घेतले आहेत. फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादवि. कलम 394, 384, 120 ब, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.
नगर तालुका पोलिस ठाण्यात देखील काही दिवसांपूर्वी हनीट्रॅपचे दोन गुन्हे दाखल झाले होते. हनीट्रॅप चालवणार्या जखणगावच्या महिलेसह तिच्या साथीदारांना पोलिसांनी अटक देखील केली. तसेच या दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नगर तालुक्यानंतर अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हनीट्रॅप समोर आला. त्यानंतर एमआयडीसी हद्दीत हनीट्रॅप घडला आहे. पोलिसांनी हनीट्रॅपच्या गुन्ह्यांची सखोल चौकशी केल्यास शहरासह जिल्ह्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. शहरातील मोठे व्यावयायिक, राजकारणी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे देखील समोर येवू शकते, अशी चर्चा आहे.

No comments:

Post a Comment