संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे शिवशाही बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे शिवशाही बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान

 संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे  शिवशाही बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान


पिंपळनेर-
जिल्ह्यात एकमेव असणार्‍या निळोबाराय महाराज पालखीतील महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी आज सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाही बस मधून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
त्या बसचे सारथ्य करण्याचा मान जिल्ह्यातील तारकपूर आगारातील शिवनाथ खाडे, आदिनाथ आव्हाड या दोन सारथ्यांना मिळाला. त्यांच्यासोबत सचिन नेमाने, महादेव गायकवाड व अनंत अडसुरे सोबत असणार आहेत.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, देवस्थान दिंडीप्रमुख अशोक सावंत यांच्यासह वारकरी उपस्थित होते. पालखीसोहळ्यासोबत चाळीस वारकर्‍यांना परवानगी देण्यात आली आहे. या वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी किरण ज्ञानदेव पठारे यांनी सॅनिटायझर, पाणी बॉटल, मास्क, हँडग्लोज भेट दिले. निळोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने दोन शिवशाही बसची व्यवस्था केलीय. तसेच दोन्ही बससोबत प्रशिक्षित वाहन चालक, तांत्रिक कर्मचारी सोबत आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी दिली. पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी श्री संत निळोबारायांच्या पादुका घेऊन जाणार्‍या बस सुरक्षित पोहचतील व प्रस्थानाच्या ठिकाणी परत सुरक्षित येतील, याचे योग्य ते नियोजन व्हावे याकरिता इसिडेंट कमांडर म्हणून श्रीगोंदा- पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ते यावेळी म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा असते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून श्री संत निळोबाराय महाराजांची ही एकमेव पालखी बसने पंढरपूरकडे जाणार आहे. पादुका घेऊन जाणार्‍या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील. प्रस्थानाच्या ठिकाणी परत सुरक्षितरित्या येतील. या बाबत योग्य ते नियोजन करण्यासाठी इसिडेंट कमांडरची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

No comments:

Post a Comment