नवभारत विद्यालयात दहावीतील गुणवंतांचा गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

नवभारत विद्यालयात दहावीतील गुणवंतांचा गौरव

 नवभारत विद्यालयात दहावीतील गुणवंतांचा गौरव


नगरी दवंडी / प्रतिनिधी 
अहमदनगर : जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या देहरे (ता. नगर ) येथील नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे सदस्य दीपकराव दरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये शाळेचा विद्यार्थी मोहित शरद करंडे याने 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच आरती शिवाजी बनकर हिने 93.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तर दिव्या भानुदास भगत या विद्यार्थिनीने 92.80 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सदस्य दीपक दरे, प्राचार्य लियाकत देशमुख 
 पर्यवेक्षक शिरीष टेकाडे, ए. आर. बर्डे, ए. डी. कांडेकर, एस. एन. राशीनकर, ए. यू. लष्कर, ए. ए. लंगोटे, ए. ए. लोखंडे, पी. पी. मुळे, एस. एन. राशीनकर, ए. डी. कांडेकर, एस. एम. आघाव, ए. एस. निमसे, एस. एस. कटारे, व्ही. बी. सोनवणे, आर. एस. पवार,एस. डी.येणारे, दादाराम हजारे, सचिन गोरे  यासह शिक्षकेतर कर्मचारी गोत्राळ, गाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. यू. लष्कर यांनी केले तर आभार शिरीष टेकाडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment