कवी दिनेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल तरुणाई फाऊंडेशनमार्फत मोफत नेत्रतपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

कवी दिनेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल तरुणाई फाऊंडेशनमार्फत मोफत नेत्रतपासणी शिबीर

 कवी दिनेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल तरुणाई फाऊंडेशनमार्फत मोफत नेत्रतपासणी शिबीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः बेलखेडा येथे सोशल तरुणाई फाऊंडेशन, गृप ग्रामपंचायत बेलखेडा, माऊली ऑप्टिकल, जिव्हाळा ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ हनुमंतखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कवी दिनेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. सध्या कोरोनची परिस्थिती चालू असल्याकारणाने सामान्य माणूस घाबरलेल्या अवस्थेत असताना तो कोणत्याही दवाखाना गाठताना त्याची दमछाक होते. वयस्कर व अनेक व्यक्तींना डोळ्यांची विविध समस्या असते आणि खेडेगावातून लांब दवाखान्यात जायला त्यांना सहज शक्य नसल्याने या जाणिवेतून डॉ.राहुल संतोष पवार (नेत्रचिकित्सक) व डॉ. ज्ञानेश्वर संतोष पवार (नेत्रचिकित्सक), रोहन जाधव (सहाय्यक), तुषार जाधव (सहाय्यक) यांच्या मार्गदर्शनाखाली कवी दिनेश जवरीलाल राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
त्याद्वारे गावातील 100 लोकांचे नेत्र तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन ही करण्यात आले. याप्रसंगी सुरेश राठोड यांच्यासह गावातील सरपंच ज्ञानेश्वर राठोड, उपसरपंच कैलास सूर्यवंशी, पोलीस पाटील वसंत पवार, पो. पा शुभांगी सूर्यवंशी, गणेश देवरे, कुंजीलाल चव्हाण, ईश्वर गायकवाड, गणेश राठोड, उत्तम चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले व सोशल तरुणाई फाऊंडेशन टीम उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here