आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलांना जातीवाचक शिवागीळ व मारहाण करणार्‍या सहा. पो. निरीक्षक व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे तहसिलदारांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलांना जातीवाचक शिवागीळ व मारहाण करणार्‍या सहा. पो. निरीक्षक व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे तहसिलदारांना निवेदन

 आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलांना जातीवाचक शिवागीळ व मारहाण करणार्‍या सहा. पो. निरीक्षक व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे तहसिलदारांना निवेदन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  येथील आदिवासी भिल्ल,पारधी समाजातील अल्पवयीन मुलांना नेवासा पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.भरत दाते व पो.कॉ. राहुल यादव यांनी जातीवाचक शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी बाबतचे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,नेवासा पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.भरत दाते व पो.कॉ. राहुल यादव व इतर कर्मचाऱयांनी अल्पवयीन मुलांना जातीवाचक शिवागीळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली आहे व आदिवासी महिला पूनम सुनील गुप्ता हिस आरेरावीची भाषा करून त्या महिलेच्या अंगावर धावून जाऊन घाणरेडे शब्द वापरले आहेत .सहा.पो.नि.दाते व पो.कॉ.यादव हे दुसर्याकडून पैसे घेऊन आदिवासी समाजावर खोटे गुन्हे दाखल करतात त्यांची रितसर चौकशी करण्यात यावी. वरील मागण्याकरिता दि.27/7/21 रोजी  संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन व पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष नानासाहेब बर्डे,उपाध्यक्ष पोपट सोनवणे,संभाजी गायकवाड,बाळासाहेब शिंदे,नंदू बर्डे,गणेश माळी,संदीप पवार,श्याम मोरे,कुमार माळी आदींच्या सह्या आहेत.

सदर दिवशी साबणे फर्निचर येथे घडलेल्या घरफोडीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना  सर्व वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन ते घरी आहे की नाही हे पाहण्याचे काम सुरू होते  सदरची बाब ही गुन्ह्याची उकल करणे व गुन्ह्यास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने करण्यात आली असून कोणा सोबतही कोणताही वाद झालेला नसून कोणालाही शिवीगाळ दमदाटी करण्यात आलेली नसून फक्त रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो घेण्यात आले ते फिर्यादीच्या दुकानात काम करणारया इसमास दाखवून रेकी करण्यात आली आहे का? याबाबत खातरजमा करण्याच्या दृष्टीने घेण्यात आले होते सदरची बाब ही गुन्ह्याची उकल व तपास करण्याच्या दृष्टीने केलेली आहे व सदरचा स्टंटबाजी करणारा इसम याच्यावर यापूर्वी जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे  दाखल आहेत फक्त भविष्यात पोलिसांनी  रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करू नये यासाठी ही स्टंटबाजी सुरू असून भविष्यात कायदा हातात घेऊन जनतेस वेठीस धरणार्‍यांवर  योग्य कायदयानव्ये गुन्हे दाखल करण्यात येतील.               - पो.नि.विजय करे

No comments:

Post a Comment