रविवारी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

रविवारी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर

 रविवारी मोफत नेत्र व  मोतीबिंदू तपासणी शिबीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आनंदऋषीजी नेत्रालय व मिसगर डायग्नॉस्टिक सेंटरच्यावतीने रविवार दि.18 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते 2 पर्यंत मिसगर लायब्ररी, मौलाना आझाद रोड, दाणे डबरा, अहमदनगर येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती युनूसभाई तांबटकर यांनी दिली.
या शिबीरामध्ये डोळ्यांचे नंबर तपासून उच्च दर्जाचे चष्मे कमी किमतींत दिले जाणार असून, ज्यांना तपासणी मध्ये मोतीबिंदू आढळल्यास बिनटाक्याची शस्त्रक्रिया 2200 रुपयांमध्ये औषधे व लेन्सच्या खर्चासह तसेच फेको पद्धतीने शस्त्रक्रिया 5700 रुपयांत औषधे व लेन्स खर्चासह आनंदऋषीजी नेत्रालयात केली जाणार आहे, असे डॉ. परवझ अशरफी यांनी सांगितले.
तरी या शिबीराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन मिसगर डायग्नॉस्टिक सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.9158153030, 9273675333 या नंबरवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment