अंधाराचे साम्राज्य आणि पोलिस गस्तीअभावी निर्मलनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवे सुरु करुन पोलिस गस्त वाढवा ः नगरसेवकांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

अंधाराचे साम्राज्य आणि पोलिस गस्तीअभावी निर्मलनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवे सुरु करुन पोलिस गस्त वाढवा ः नगरसेवकांची मागणी

 अंधाराचे साम्राज्य आणि पोलिस गस्तीअभावी निर्मलनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळदिवे सुरु करुन पोलिस गस्त वाढवा ः नगरसेवकांची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शुक्रवार दि. 16 रोजी पहाटे 2 ते 4 च्या सुमारास अज्ञात 7 ते 8 तरुण चोरट्यांनी निर्मलनगर व परिसरात अंधाराचा फायदा घेवून घरे, दुकाने, फोडण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसला. याबाबत येथील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत असून, अंधारामुळे मात्र चेहरे व्यवस्थीत दिसत नसल्याने पुन्हा ते या भागात येतील असा भिती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वांचेच जीवन हतबल झाले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले तर तरुणांना नवीन नोकरी मिळणे अशक्य झाले, त्यामुळे बेरोजगार तरुणांची संख्या वाढली. हाताला काम नाही. वाढत्या महागाईमुळे जगणं मुश्किल झाले. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक देखील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आलेला दिवस घालवयाचा, असे करुन जगात आहेत.
अशा या बिकट परिस्थितीत तरुणांनी कामा अभावी आपला मोर्चा गुन्हेगारीकडे वळवलाय असून, घरफोड्या, लुटमार करुन उदारनिर्वाहाचे साधन शोधत आहेत. शुक्रवार दि.16 रोजी पहाटेच्या सुमारास 7 ते 8 तरुणांनी निर्मलनगर परिसरात घरफोड्या करण्याच्या उद्देशाने धुमाकूळ घातला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
निर्मलनगर व परिसरात अंधाराचे साम्रज्य आहे. पोलिस गस्त नसल्याने या चोरट्यांनी त्याचा फायदा घेत आहे.  या भागातील घरे, दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसला, पण त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला, असून आमचे संरक्षण कोण करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
याबाबत प्रभागातील नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी नागरिकांशी संपर्क साधून धीर दिला. तातडीने या भागात मनपा आयुक्तांनी दिवे बसवून अंधाराचे साम्राज्य त्वरित दूर करावे, तर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. आयुक्तांना तातडीने निवेदन देऊन ज्या भागात अंधार आहे, तेथे दिवे लावण्याची मागणी करण्यात येणार आहे. तोफखाना पोलिसांना देखील गस्त वाढविण्यासाठी भेटून मागणी करु, असे निखिल वारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment