भविष्य पाहण्याच्या नादात गृहिणीची फसवणूक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

भविष्य पाहण्याच्या नादात गृहिणीची फसवणूक.

 भविष्य पाहण्याच्या नादात गृहिणीची फसवणूक.

नंदीबैल घेवून येणार्‍या 3 जणांवर गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नंदीबैलाच्या माध्यमातून भविष्य पाहण्याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल असल्याचे पूर्वी आपण पाहात आलो आहे. पण आता काळ बदलला माहिती-तंत्रज्ञानाच्या या काळातही नगर शहरातील एक महिला भविष्य पाहण्याच्या नादात 50 हजार रुपये गमावून बसली आहे. नंदीबैल घेवून वावरणार्‍या तीन इसमांनी 50,000 रुपयांना फसवल्याची फिर्याद तलाठी कार्यालय जवळ राहणार्‍या सविता मवाळ या गृहिणीने दिली आहे. व्यापामध्ये अडकलेल्या महिलेला भुरळ पाडून, तुमचे भविष्य सांगतो, तुमच्या घराची शांती करु असे म्हणत नंदीबैल  घेऊन येणार्‍या तीन इसमांनी संबंधित महिलेला 50 हजार रुपये घेऊन फसवल्याची घटना घडल्या प्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या घटनेतील फिर्यादी सविता मवाळ या गृहिणी असून त्या भिस्तबाग तलाठी कार्यालय जवळ राहत आहे. मवाळ यांना घरगुती अडचणी त्यांच्या समोर होत्या, आज सकाळच्या सुमाराला तीन जण नंदीबैल घेऊन त्यांच्या घरापाशी आलेले होते. त्यांनी सविता मवाळ त्यांच्या दारापाशी बोलून त्यांच्याशी चर्चा केली, तुम्ही संकटात सापडलेल्या  आहात. तुमच्या मागे व्याप लागलेला आहे. तुमचे घर पाहता तुम्हाला अनेक अडचणी आहे. त्या दूर करण्यासाठी तुम्हाला भविष्य सांगून, तुम्हाला घरासाठी पूजापाठ करावा लागेल. यासाठी एक लाख 37 हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले, ही चर्चा सुरू झाली असताना संबंधित महिलेने त्यांच्या घरी असलेले 50 हजार रुपये काढून त्या इसमांच्या हातामध्ये दिले. त्या महिलेला त्यांनी आम्ही दुपारच्या वेळेला परत येतो  नंतर आपण पूजापाठ करू असे सांगितले. दुपार झाल्यानंतर घराकडे कुणीच यायला तयार नाही ,संबंधित महिलेने ज्यांना पैसे दिले होते त्यांचा मोबाईल नंबर घेऊन ठेवलेला होता. दुपारनंतर ज्यावेळेला ते येणार होते. तेव्हापासून त्या संबंधित व्यक्तीने दिलेल्या नंबरवर सातत्याने संपर्क करत होत्या, मात्र तो फोन बंद होता. सायंकाळपर्यंत त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही ही बाब संबंधित महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तोफखाना पोलिसांना ही हकीकत सांगितली व आपली फसवणूक झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी सविता मवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये नंदीबैलवाले अनोळखी तीन इसम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक डी आर जाधव हे करत आहे. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आम्ही या घटनेचा तपास सुरू केला असून अशा प्रकारे फसवाफसवीचे प्रकार वाढत चालले आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा दक्ष राहणे गरजेचे आहे या घटनेचा छडा पोलिस लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment