अधिकारी व कर्मचार्‍यांनी वेळेचे पालन करावे, अन्यथा निलंबनास सामोरे जावे - उपमहापौर भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

अधिकारी व कर्मचार्‍यांनी वेळेचे पालन करावे, अन्यथा निलंबनास सामोरे जावे - उपमहापौर भोसले

 अधिकारी व कर्मचार्‍यांनी वेळेचे पालन करावे, अन्यथा निलंबनास सामोरे जावे - उपमहापौर भोसले

उपमहापौरांची मनपा कार्यालयास अचानक भेट.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेचे कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय कामकाजांच्या वेळा पाळणे  गरजेचे आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी कामकाजाच्या वेळा पाळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत  आज उपमहापौर गणेश भोसले यांनी अचानक पुणे औरंगाबाद रोडवरील मनपा मुख्य कार्यालय भेट दिली. शिपायाची कामकाजाची वेळ सकाळी साडेनऊ वाजता आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाची वेळ 9.45 आहे. मी आज 11 वाजता कार्यालय मुख्य महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन भेट दिली असता, काही कर्मचारी व अधिकारी वेळेवर न आल्याचे निदर्शनास आलेे. उद्या पासून सर्वांनी  शासकीय वेळेचे पालन करावे अन्यथा निलंबनाला सामोरे जावे लागेल अशी ताकीद उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा कर्मचार्‍यांना ताकीद दिली की अधिकारी व कर्मचार्‍यांना महापालिकेच्या कामानिमित्त साइटवर जायचं असेल त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून जाण्याचे कारण सांगावे. यापुढील काळात नगर मनपाची प्रतिमा उंच व्हायची असेल तर आपण आपले कर्तव्याचे पालन करावे. आपण जनतेचे काम करावे त्यासाठी आपण जनतेकडून मोबदला घेतो. यापुढील काळात अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चुका सहन केल्या जाणार नाहीत. तरी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी शासकीय वेळेचे  पालन करावे उद्यापासून अचानक पणे कोणत्याही प्रभाग कार्यालयात भेट दिली जाईल याची दक्षता घ्यावी.

No comments:

Post a Comment