बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या.

 बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचेची कारवाही.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मागच्या आठवड्यात टाकळी काझी येथील बंद पडलेल्या नाक्याजवळ दोन इसमांना गावठी कट्टे विक्री करण्यासाठी आले असता ताब्यात घेण्यात आले. आता श्रीरामपूर येथून दोन आरोपींना गावठी कट्टे बेकायदेशीररित्या बाळगल्या प्रकरणी व विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असताना ताब्यात घेण्यात आले.

सदर घटनेची हकीकत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍याकडून पक्की माहिती मिळाली की दोन इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथे येणार आहे. मिळालेली माहिती ही तपासून घेत श्रीरामपूरला एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाला ताबडतोब ही माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे पोलीस नाईक गणेश इंगळे पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी,  विशाल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहित येमुल ,बबन बेरड,  अशांनी मिळून दोन पंच यासह खाजगी वाहनाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावला त्याच वेळी दोन इसम श्रीरामपूर येथील दहाव्याच्या वट्या जवळ येऊन संशयित नजरेने इकडे तिकडे पाहूं लागली त्यावेळी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले . प्रेम पांडुरंग चव्हाण , आकाश राजु शेलार ,असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांची अंगझडती घेतली असता दोन गावठी कट्टे व सात जिवंत काडतुसे असा एकूण 63,500 रुपये किमतीचे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे मिळून आली आहे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे व विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment