पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज : आ. अरुण जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज : आ. अरुण जगताप

 पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज : आ. अरुण जगताप

स्नेहबंध फौंडेशन तर्फे नगर शहरातील आयुर्वेद कॉलेज येथे वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व समजले आहे. आपणाला झाडापासून ऑक्सिजन मिळते. त्यामुळे नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.  पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.
स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने नगर शहरातील आयुर्वेद कॉलेज येथे नुकतेच आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, वैभव जगताप, हेमंत ढाकेफळकर, भूपेंद्र परदेशी, सचिन पेंडूरकर आदी उपस्थित होते.
आमदार अरुण जगताप म्हणाले, प्रत्येकाने एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संवर्धन करणे ही तेवढेच गरजेचे आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणास आपण हातभारच लावणार आहोत. स्नेहबंध सोशल फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. यापुढेही स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील, अशी मला खात्री आहे. स्नेहबंध फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आश्वासन आमदार जगताप यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment