कोळगाव येथे कृषी कन्येचे स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

कोळगाव येथे कृषी कन्येचे स्वागत

 कोळगाव येथे कृषी कन्येचे स्वागत


श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे लोणी प्रवरा येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येचे आगमन झाले आहे परिसरातील शेतकर्‍यांनी कृषी कन्येचे स्वागत केले. पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी महाविद्यालयात कृषी कन्या नम्रता काळे शिक्षण घेत असून संस्थेचे कृषी शिक्षण संचालक भारत घोगरे, प्राचार्य निलेश दळे, कार्यक्रम समन्वयक प्रा.रमेश दसपुते, प्रा. प्रियांका दिघे, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या कोळगाव येथील शेतकर्‍यांचे अनुभव जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे. यावेळी सरपंच सौ वर्षा काळे, ग्रामपंचायत सदस्य बापू नलगे, माजी सरपंच विठ्ठल नलगे, संभाजी काळे, विजय क्षीरसागर यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment