सारस पक्षास दिले जीवनदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

सारस पक्षास दिले जीवनदान

 सारस पक्षास दिले जीवनदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः जखमी झालेल्या सारस पक्षाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून त्याचेवर प्राथमिक उपचार करत त्यास वनविभागाच्या अधिकार्‍याच्या ताब्यात देण्यात आले.
आज दि 18 जुलै रोजी सकाळी गोदड महाराजगल्ली मध्ये एका जखमी व असाह्य पक्षावर कुत्रे तुटून पडत होते व त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न हा पक्षी करत होता ही बाब नगरसेवक सचिन घुले व त्याचे सहकारी यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर पक्षाची या कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली व त्याला उचलून आपल्या गाडीतून भांडेवाडी येथील शेलारमामा यांच्या गॅरेज जवळ आणण्यात आले तेथे या पक्षास पाणी पाजण्याचा काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात त्राणच राहिले नसल्याने तो प्रतिसाद देत नव्हता, दरम्यान घुले यांनी वन विभागाचे अधिकारी केदार यांना संपर्क साधण्यात आला, तर डॉ. साळुंके यांना ही संपर्क साधन्यात आला असता ते तात्काळ तेथे आले व त्यांनी या पक्षास पाहून त्यास प्राथमिक इंजेक्शन दिले व वन विभागाच्या कर्मचार्‍याच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पक्षीप्रेमी गोकुळ शिंदे, डॉ. साळुंखे, चंद्रकांत शेलार, डॉ. अनुरथ साळुंखे, ओंकार तोटे, भाऊसाहेब शेलार, उमेश गलांडे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment