ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रियाज हवालदार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रियाज हवालदार

 ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रियाज हवालदार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः
पंचायत समिती श्रीगोंदा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एन.जी.पी. 4511 अंतर्गत श्रीगोंदा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा कर्मचारी मेळावा संपन्न झाला.यावेळी श्रीगोंदा तालुका संघटना मजबुत करण्यासाठी कार्यकारिणीची फेर निवड करण्यात आली.
श्रीगोंदा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी बेलवंडी ग्रामपंचायतचे अधिक्षक रियाज हवालदार तर उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल गोंटे, सचिवपदी गणेश इधाटे तर तालुका संघटक म्हणून बेलवंडी ग्रामपंचायतचे हेड क्लार्क रहिम हवालदार यांची निवड सर्वानुमते नीवड करण्यात आली. तसेच ढवळगाव ग्रामपंचायत कर्मचारी सुनील शिंदे यांची जिल्हा कार्यकारीणी सदस्य पदी निवड करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सचिव तथा  अहमदनगर जिल्हा सचिव दिलीप डिके होते. यावेळी कर्मचार्‍यांच्या विविध समस्या, वेतन, प्रोव्हिडंट फंड, पेन्शन योजना या विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आत्माराम घुणे जिल्हा उपाध्यक्ष, रामदास ससाणे जिल्हा संघटक, त्रिंबक पाचरणे उपाध्यक्ष जामखेड तालुका, नाना साठे सचिव जामखेड तालुका, शहाजी सोनवणे कार्याध्यक्ष जामखेड तालुका तसेच वैजनाथ घोडखिंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीगोंदा तालुका अध्यक्ष रियाज हवालदार, प्रस्तावना गणेश इधाटे यांनी केली. कार्यक्रमाचा समारोप शशीकांत म्हस्के यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here