प्रा. सुरेश रासकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

प्रा. सुरेश रासकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी

 प्रा. सुरेश रासकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पिंपळनेर गावचे सुपुत्र प्रा. सुरेश रासकर यांना मुंबई विद्यापीठाने विद्यावाचस्पती(पीएच.डी) पदवी बहाल केली. प्रा. रासकर यांनी मराठी विषयांतून ’मराठी कादंबरीतील स्त्री जीवनाचे चित्रण या विषयावर एप्रिल 2019मध्ये संशोधन प्रबंध सादर केला होता.
प्रस्तुत संशोधनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. अलका मटकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
राणी चेन्नमा बेळगाव विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत वाघमारे सर हे परीक्षक म्हणून मौखिक परीक्षेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी डॉ. सुरेश रासकर यांचे संशोधन प्रबंधाच्या अनुषंगाने विशेष कौतुक केले. संपूर्ण प्रबंध मेहनत घेवून तयार केला आणि एक आदर्श संशोधक कसे असावेत याचे उदाहरण डॉ. सुरेश असल्याचे ते म्हणाले. या पदवी परीक्षेच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख स्त्रीवादी समीक्षक डॉ. वंदना महाजन होत्या. यावेळी उपस्थित प्राध्यापकवर्ग आणि संशोधक विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
प्रा. डॉ. सुरेश रासकर हे पिंपळनेर गावचे सुपुत्र असून गावातून विद्यावचस्पती (झह.ऊ.) पदवी मिळवणारे ते प्रथम आहेत. यामुळे पिंपळनेर आणि पंचक्रोशीतून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे. सध्या ते पुण्यातील नामांकित असलेल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा.श्यामकांत देशमुख यांनीही डॉ. सुरेश रासकर यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment