राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस

 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः कोविडं महामारीमुळे शालेय शिक्षण व्यवस्थाचं पूर्ण बदलून गेली आहे. अशातच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या जन्मदिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका पदाधिकार्‍यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नवे पर्व सुरू केले आहे.
राहाता तालुक्यातील पिंपळवाडी गावातील  गोरगरीब, आदिवासी तसेचं होतकरू अशा दहा विद्यार्थ्यांची निवड करून या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वर्षभराचा सिलाबस कव्हर करणारा महागड्या स्वरूपाचा गुणवत्तापूर्ण खाजगी  डिजिटल शिक्षण कोर्से घरबसल्या विनामूल्य स्वरूपात सुरू करून देण्यात आला आहे. बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष विजय काकडे यांच्या संकल्पनेतून नवीन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी प्रामुख्याने साई सृष्टी एजुकेशन राहाताचे संचालक प्रो. मयूर कुदळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रहारच्या या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम असणार्‍या पालकांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या निकालात जसे हमखास दहा ते पंधरा टक्के वाढवणारे  गुणवत्तापूर्ण खाजगी  शिक्षण कोर्से सुरू करून घेतले होते. ज्या कोर्सेची वर्षभराची अंदाजित रक्कम पाच ते दहा हजार रुपयांची आहे तेच शिक्षण  राहाता तालुका प्रहार टीमच्या अथक परिश्रमातून आता सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील शाळकरी विद्यार्थ्यांना विनामूल्य मिळत आहे . तसेच या विद्यार्थ्यांची  शिक्षणाविषयी आस वाटून, गुणवत्ता वाढणार आहे. एकअर्थी राहाता तालुका प्रहार टीमने  सारे शिकू या, पुढे जाऊ या... ही उक्तीचं बुलंद केली आहे. प्रहारची ही अनोखी शैक्षणिक भेट मिळाल्याने गोरगरीब शाळकरी मुलांच्या चेहर्‍यावर समाधानाचे आर्त हसू फुलले होते. प्रहारच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके , तालुका उपाध्यक्ष विजय काकडे, तालुका संघटक वसंतराव काळे आणि नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मतदारसंघात प्रदीर्घ सेवा देणारे सेवानिवृत्त नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुळवे साहेब यांच्या प्रयत्नातुन राहाता तालुक्यातील पिंपळवाडी  येथील गोरगरीब, आदिवासी तसेच होतकरू शालेय विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळत आहे गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी श्री सातव साहेब यांनी प्रहारच्या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार जिल्हा संघटक अभिजित कालेकर, राकेशदादा भोकरे, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, प्रहार दिव्यांग क्रांती तालुकाध्यक्ष भाऊंनाथ गमे दिव्यांग क्रांती उपाध्यक्ष नितीनकुमार भन्साळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुका समनवयक जगन्नाथ सरोदे, निमगाव उपाध्यक्ष सचिन आरने, राहाता शहर प्रमुख अविनाश सनासे, रामा पवार यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला.

No comments:

Post a Comment