विठ्ठलरुपी निसर्गाची भक्ती वृक्षरोपणाने सुरु - संजय सपकाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

विठ्ठलरुपी निसर्गाची भक्ती वृक्षरोपणाने सुरु - संजय सपकाळ

 विठ्ठलरुपी निसर्गाची भक्ती वृक्षरोपणाने सुरु - संजय सपकाळ

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, श्रीरंग देवकुळे, अजेश पुरी, विकास भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे, विकास निमसे, सुर्यकांत कटोरे, रमेश कडूस, मनोहर पाडळे, राजू कांबळे, दिलीप बोंदर्डे, किरण फुलारी, संतोष रासकर, सुधीर दहीफळे, नितीन पाटोळे, माधव भांबुरकर, गणेश नगरे, राहुल मोहिरे, अब्बासभाई शेख, दिपक बोंदर्डे, अतुल वराडे, विलास दळवी, सुधाकर चिदंबर, सरदारसिंग परदेशी, बाबासाहेब तांबे, राहुल दिवटे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, विठ्ठलरुपी निसर्गाची भक्ती वृक्षरोपणाने सुरु आहे. या भक्तीची आराधना सर्व ग्रुपचे सदस्य वृक्षसंवर्धनाने करीत आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रत्येक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी व वाढदिवस कार्यक्रम वृक्षरोपणाने  साजरा करण्यात येतो. ग्रुपने हजारो झाडे लावून जगवली आहेत. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देऊन वृक्षरोपण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रुपचे सदस्य अजेश पुरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देखील वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, शिवार बहरु दे, प्रत्येकास धनधान्य येऊ दे व कोरोनारुपी संकटाचे नायनाट करण्याचे साकडे घालण्यात आले.

No comments:

Post a Comment